शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

एकीकडे ‘घर चलो’ अभियान, दुसरीकडे गृहकलहाकडे नाही ध्यान; भाजपमधील गटबाजीकडे प्रदेशाध्यक्षांचा कानाडोळा

By अविनाश कोळी | Updated: October 12, 2023 13:36 IST

गटबाजीचा हा प्रश्न निवडणुकीपूर्वी पक्षाची चिंता वाढविणारा ठरू शकतो

अविनाश कोळीसांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘घर चलो’ अभियानानिमित्ताने सांगली दौरा केला. मात्र, या दौ-यात गृहकलहाकडे दुर्लक्ष केले. विविध मतदारसंंघांतील पदाधिकारी व नेत्यांनी पक्षातील गटबाजीचे प्रकार त्यांच्या कानावर घातले. पण त्याकडे कानाडोळा करीत त्यांनी पक्षीय अभियानाची औपचारिकता पार पाडण्यात धन्यता मानल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.भाजपकडून जिल्ह्यात लोकसभेची तयारी म्हणून निवडणूक प्रमुखांची निवड केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुखांना पक्षीय संघटन मजबूत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्याचा दौरा आखून ‘घर चलो’ अभियान राबविले. नागरिकांशी संवाद साधत असतानाच पक्षातील बिघडलेला संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचला. गटबाजीचा बेसूर आवाज दौऱ्यावेळी त्यांच्या कानावर पडला, पण त्यांनी कानावर हात ठेवत अभियानावर लक्ष केंद्रित केले.त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर गटबाजीचा पूर्वीचा सौम्य स्वर आता तार सप्तकात पोहोचला आहे. हे गाणे सुरात नसल्याने त्याची दखल घेणे प्रदेशाध्यक्षांनी आवश्यक होते, असे मत निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. गटबाजीचा हा प्रश्न निवडणुकीपूर्वी पक्षाची चिंता वाढविणारा ठरू शकतो.

मिरजेतील गटबाजीचा ऊहापोहमिरजेच्या शासकीय विश्रामगृहातील सुकाणू समितीच्या बैठकीत पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या. पालकमंत्र्यांनीही त्यांना अडथळा ठरणाऱ्या काही पदाधिकारी, नेत्यांची तक्रार खासगीत त्यांच्याकडे केली. ‘पाहतो’, अशा एका शब्दात बावनकुळेंनी या विषयावर पडदा टाकला.

जतमधून बंडाचा झेंडाजत तालुक्यातील गटबाजी गेल्या कित्येक महिन्यांपासून उफाळली आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीतील निवडीला माजी आमदार विलासराव जगताप यांनी आक्षेप घेतला. त्यावरून धुसफूस सुरु असतानाच आता लोकसभेचा उमेदवार बदलला नाही तर पक्षाचे काम न करण्याचा इशाराच जगताप यांनी दिल्याने पक्षात कल्लोळ सुरू आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याकडेही पाठ फिरवली.

संजय पाटील-पृथ्वीराज देशमुख यांच्यात मतभेद उघडखासदार संजय पाटील व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. तरी आता यात नवा अध्याय लिहिला जात आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यावर खासदारांनी टीका केली. त्यानंतर देशमुखांनी लगेचच सुमनताईंना पाठिंबा दिला. लोकसभेच्या उमेदवारीवर देशमुखांनी दावेदारी केल्याने हे दोन्ही नेते आमने-सामने आलेत. तसेच, त्यांच्यातील मतभेदाविषयी उघडपणे बोलले जात आहे.

महायुतीचा संघर्षही टोकालामहायुतीत शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये खानापूर मतदारसंघात संघर्ष उफाळला आहे. विधानसभेच्या या जागेवर विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्याविरोधात भाजपच्या पडळकरांनी शड्डू ठोकला आहे. भाजपमधील नेते दोन्ही नेत्यांच्या समर्थनार्थ विभागले गेले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपा