शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पुणे-बेंगलुरू हरित महामार्ग योगेवाडी औद्योगिक वसाहतीला जोडणार

By संतोष भिसे | Updated: March 9, 2024 17:17 IST

तासगावच्या विकासाला चालना, प्रकल्पाचा अहवाल केंद्राकडे

संतोष भिसेसांगली : प्रस्तावित पुणे बेंगलुरू हरित महामार्ग जिल्ह्यातील तासगाव, विटा, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यांतून जात आहे. तो योगेवाडी (ता. तासगाव) औद्योगिक वसाहतीला जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महामार्गाच्या माध्यमातून ही वसाहत वेगाने विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे.

पुणे ते बेंगलूरूदरम्यान नवा हरित महामार्ग विकसित होत आहे. सध्याच्या पुणे-बेंगलुरू महामार्गासाठी तो पर्यायी असेल. या बहुचर्चित महामार्गाचा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर झाला आहे. भारतमाला प्रकल्पातून हा महामार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून त्याचा प्रवास होईल. सांगली जिल्ह्यात खानापूर, तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतून जाईल. सध्याच्या पुणे-बेंगलुरू महामार्गापेक्षा तो लांबीला ९३ किलोमीटरने कमी आहे.हा हरित महामार्ग योगेवाडी औद्योगिक वसाहतीला जोडण्याचे नियोजन आहे. यामुळे या भागाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. योगेवाडी वसाहतीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरून नवा महामार्ग जातो. हे अंतर थेट महामार्गाने जोडल्यास उद्योगांना चालना मिळेल असा शासनाचा विचार आहे. वसाहतीचे काम येत्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा महामार्ग हायवे कॉरिडॉरला जोडण्याची मागणी होत होती.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना देऊ, असे स्पष्ट केले आहे. योगेवाडी वसाहत महामार्गाने जोडली गेल्यास संपूर्ण तासगाव तालुक्याच्या विकासालाच चालना मिळणार आहे. कृषी आधारित उद्योग येथे येऊ शकतील. सांगली, मिरज वसाहतीत सध्या मोठ्या प्रकल्पांसाठी पुरेशी जागा शिल्लक नाही. औद्योगिक विकासाचा हा केंद्रबिंदू महामार्गामुळे योगेवाडी वसाहतीकडे वळवता येऊ शकतो.

हरित महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या गावांतून जातो. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाणमधून जातो. कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव, मळणगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळीमध्ये येथून, तर मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी या गावांतून जातो. ही गावे थेट योगेवाडी वसाहतीला जोडली जातील.

योगेवाडीचा थेट पुण्याशी व्यवहार७४५ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आठ मार्गिकांचा असून, पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गापेक्षा रुंद म्हणजे १०० मीटर असेल. काँक्रीटऐवजी डांबरीकरण होणार असून, ताशी १२० किलोमीटर गतीने प्रवास करता येईल. पुण्यात वरवे बुद्रुकपासून प्रारंभ होऊन सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून जाईल. योगेवाडी वसाहतीला जोडल्यानंतर ही वसाहत पुण्यातील उद्योगांशी थेट जोडली जाणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग