शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पडक्या, गळक्या इमारतीत रुग्णसेवा, भोसे आरोग्य केंद्रातील दुरावस्था; रुग्णांना पाठवलं जातय सांगली, मिरजेला

By संतोष भिसे | Updated: July 27, 2023 18:07 IST

सांगली : भोसे (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागली आहे. छतामधून गळणाऱ्या पावसातच रुग्णांवर उपचार करावे ...

सांगली : भोसे (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागली आहे. छतामधून गळणाऱ्या पावसातच रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. त्याचा गंभीर परिणाम रुग्णसेवेवर झाला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीत सहा-सात महिन्यांपासून दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यासाठी सुमारे ५५ लाख रुपये खर्च केला जात आहे. या काळात रुग्णसेवा कर्मचारी निवासामध्ये सुरु ठेवण्यात आली आहे. रुग्णांना तपासणे, किरकोळ उपचार करणे ही कामे जुन्या निवासी इमारतीतच केली जात आहेत. या निवासी इमारती अनेक वर्षांपासून वापराविना आहेत, त्यामुळे त्यांचीही दुर्दशा झाली आहे. छताच्या स्लॅबचे ढलपे निखळून पडले आहेत. सळ्या बाहेर दिसत आहेत. त्यातून पावसाचे पाणी झिरपत आहे. दरवाजे तुटले असून खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. अतिशय कोंदट व अपुऱ्या जागेत रुग्णसेवा सुरु आहे. रुग्णांना छत्री डोक्यावर घेऊनच आरोग्य केंद्रात यावे लागत आहे.पुरेशी इमारत नसल्याने फक्त बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे. प्रसूती किंवा अन्य उपचारांसाठी रुग्णांना दाखल करता येत नाही, त्यांना मिरज किंवा सांगलीला पाठवले जात आहे. पडक्या व गळक्या इमारतीत काम करावे लागत असल्याने डॉक्टर व कर्मचारीही हैराण आहेत. डोक्यावरच्या छताचा तुकडा कधी पडेल याचा नेम नसल्याने जीव मुठीत धरुन काम करावे लागत आहे. औषधे व उपकरणे पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.कामही गतीने पूर्ण करण्याची मागणी आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील काही खोल्यांचे काम पूर्ण झाले असून, तेथे कामकाज सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उर्वरित कामही गतीने पूर्ण करण्याची मागणी आहे.

टॅग्स :SangliसांगलीHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल