शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सांगली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वाढणार, पण भिंतीमुळे विस्तारीकरण फसणार

By अविनाश कोळी | Updated: September 9, 2023 18:46 IST

‘रेड सिग्नल’ कायम : नव्या गाड्या मिळण्यालाही अडथळे

सांगली : पुणे-लोंढा रेल्वे दुपदरीकरण, विद्युतीकरण प्रकल्पांतर्गत रद्द झालेले सांगलीरेल्वे स्थानकावरील नवे दोन प्लॅटफॉर्म पुन्हा मंजूर झाले आहेत. मात्र, पाचव्या प्लॅटफॉर्मवर मालगाड्यांसाठी भिंत उभारली जाणार असल्याने विस्तारीकरणाचा हेतू सफल होणार नाही. याशिवाय नव्याने रेल्वे गाड्या मंजुरीलाही अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे पाचव्या प्लॅटफॉर्मवरील भिंत बांधण्याची रेल्वे प्रशासनाची योजना रद्द करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.सांगलीच्या स्थानकावर अतिरिक्त दोन प्लॅटफॉर्ममुळे दुपदरीकरण व विद्युतीकरणाचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. कोल्हापूरपासून पुण्याकडे किंवा कर्नाटकातील गाड्यांचा पुण्याकडील प्रवास किंवा पुण्याकडून दक्षिणेकडील प्रवास जलदगतीने होणार आहे. मात्र, नवे दोन प्लॅटफॉर्मना सुरुवातीला रद्द करुन आता पुन्हा नव्याने मंजुरी दिली आहे. याचा आनंद व्यक्त केला जात असला तरी पाचव्या प्लॅटफॉर्मचा वापर हा केवळ मालगाड्यांपुरताच होणार असल्याने ही विस्तारीकरण योजना पूर्णपणे सफल होणार नाही. अडचणी पुन्हा वाट्याला येणार आहेत.रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन करताना या अतिरिक्त प्लॅटफॉर्मचा मोठा लाभ प्रवाशांना होणार आहे. क्रॉसिंगची झंझट आता होणार नाही. पण, पाचवा प्लॅटफॉर्म हा प्रवासी गाड्यांसाठी उपयोगात येणार नाही. मालगाड्यांसाठी तो प्रशासनाने राखीव ठेवला आहे. त्यामुळे याठिकाणी भिंत उभी केली जाईल. प्रवाशांना याठिकाणी उतरता येणार नाही.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे