शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: प्रदूषणाच्या आडून 'वसंतदादा' बंद पाडण्याचा काही नेत्यांचा डाव, विशाल पाटील यांचा गंभीर आरोप

By अशोक डोंबाळे | Updated: September 29, 2023 18:55 IST

जिल्हा बँकेचे १७.८० कोटींचे कर्ज शिल्लक

सांगली : येथील वसंतदादा साखर कारखाना सुरळीत चालूच नये, यासाठी काही नेत्यांकडून कुरघोड्यांचे राजकारण चालू आहे. कृष्णा नदीतील मृत माशांना अनेक कारखाने जबाबदार असताना वसंतदादा कारखान्यावर ठपका ठेवून डिस्टिलरी बंद पाडली. प्रत्येक गोष्टीत वसंतदादा कारखाना अडचणीत आणून बंद पाडण्यासाठी काही नेत्यांकडून खेळी आखली जात आहे, असा आरोप वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केला.वसंतदादा कारखान्याची सभा शुक्रवारी झाली. यावेळी विशाल पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, अनेक संकटांवर मात करून कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. कारखाना भाड्याने दिल्यापासून जिल्हा बँकेचे केवळ १७ कोटी ८० लाख ९० हजार रुपये कर्ज थकीत आहे. वर्षभरात कारखाना बँकेकडून कर्जमुक्त होणार आहे. कामगार, बँका, शेतकऱ्यांसह अन्य काही देणी थकीत आहेत. या देण्यातूनही दोन वर्षांत कारखाना कर्जमुक्त होऊन सभासदांचा होणार आहे. कारखाना दर्जेदार चालविणार आहे. कारखाना सभासदांचा झाल्यानंतर अन्य कारखान्यांपेक्षा वसंतदादा कारखाना १०० ते २०० रुपये जादा दर देणार आहे.अनेक आर्थिक अडचणींवर मात करून कारखाना चालवत आहे. तरीही काही नेते कारखाना बंद पाडण्याच्याच प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी कृष्णा नदीचे प्रदूषण वसंतदादा कारखान्यामुळे झाल्याचा आरोप करून डिस्टिलरी बंद पाडली. वास्तविक पाहता सांगलीत कृष्णा नदीत मासे मरण्यापूर्वी भिलवडीच्या वरही मासे मेले होते. यावेळी प्रदूषण अधिकाऱ्यांनी कारवाईची तत्परता दाखविली नाही. दूधगाव येथे वारणा नदीतही मासे मेले होते. यावेळीही कारवाई झाली नाही. उलट वसंतदादा कारखाना प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही वसंतदादा कारखान्यावर तत्काळ कारवाई होते, अन्य कारखान्यांवर मात्र होत नाही, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.यावेळी उपाध्यक्ष सुनील आवटी, अमित पाटील, यशवंतराव पाटील, विक्रमसिंह पाटील, जिनेश्वर पाटील, दौलतराव शिंदे, शिवाजी पाटील, आदींसह संचालक, सभासद, शेतकरी उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले.

खोटे ओळखपत्र आणल्यास कारवाईदसरा ते दिवाळीपर्यंत सभासदांना साखरचे वाटप करण्यात येणार आहे. ओळखपत्र असणाऱ्यांनाच साखर देणार आहे. दसऱ्यापूर्वी दहा दिवस ज्या सभासदांना यापूर्वी साखर मिळाली नाही, त्यांना ती देण्यात येणार आहे. खोटे ओळखपत्र घेऊन येणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही विशाल पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने