शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या राज्यघटनेतील कलमांची संख्या कमी हाेतेय - डॉ. राजरत्न आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 17:31 IST

सर्वसामान्यांचे दलित व मागास प्रवर्गातील हक्काचे शिक्षण संपत चालले आहे. मूलभूत अधिकारावर गदा आणली जात आहे.

जत : देशाच्या राज्यघटनेत बाबासाहेबांनी लिहिलेल्या कलमांची संख्या कमी होत चालली आहे. सर्वसामान्यांचे दलित व मागास प्रवर्गातील हक्काचे शिक्षण संपत चालले आहे. मूलभूत अधिकारावर गदा आणली जात आहे. ज्या व्यवस्थेने मोठ्या पदावर बसण्याची संधी दिली, ती सुरक्षित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. त्याला लाथाडले तर पुन्हा समाजाला न्याय देण्यासाठी नवा आंबेडकर मिळणार नाही, असे प्रतिपादन ऑल इंडिया बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.जत येथे मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. राजरत्न आंबेडकर बोलत होते. यावेळी बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप तांजणे, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, बसपाचे माजी केंद्रीय सचिव राहुल सरवदे, संजीव सदाफुले, खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, ॲड. सी. आर. सांगलीकर, माजी आमदार विलासराव जगताप, सुरेश शिंदे, डॉ. रवींद्र आरळी, विवेक कांबळे, प्रकाश जमदाडे, तम्मनगौडा रवी-पाटील, अमोल डफळे, सरदार पाटील, डॉ. कैलास सनमडीकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती.  सुरेश खाडे म्हणाले, या तालुक्यातील माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आमदार, कामगार मंत्री बनू शकला, ते फक्त बाबासाहेबांच्या घटनेमुळे. त्यांचे समाजातील प्रत्येक घटकावर उपकार आहेत. हे कधीच विसरू चालणार नाही. त्यांच्या विचाराचा पाईक म्हणून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम करू.  खासदार पाटील म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान अनमोल आहे. त्याच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला.  संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अतुल कांबळे यांनी स्वागत केले. संतोष ऊर्फ भूपेंद्र कांबळे यांनी आभार मानले.अधिकारी घडावेतडॉ. आंबेडकर म्हणाले, जतमध्ये बाबासाहेबांचा पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. या पुतळ्याच्या दहा किलोमीटर अंतरात आयएएस, आयपीएस अधिकारी निर्माण झाले तरच या लोकार्पणाला अर्थ आहे. 

टॅग्स :Sangliसांगली