शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटरच्या ‘आका’ एजन्सी मोकाट; जीव गेल्यावर जाग येणार का?

By अविनाश कोळी | Updated: April 28, 2025 19:25 IST

कारवाईची औपचारिकता नको : घरगुती सिलिंडरचा प्रवास पुरवठा विभाग शोधणार का?

अविनाश कोळीसांगली : सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर्सवर जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरी ती औपचारिकता ठरायला नको. अधिकृत ग्राहकांसाठीचे सिलिंडर काही गॅस एजन्सींमार्फत या गॅसमाफियांपर्यंत पुरविले जात आहेत. याची चौकशी पुरवठा विभाग व पोलिस करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर्सच्या बाजारावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांमार्फत अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, या अड्डेचालकांचा ‘आका’ म्हणून कार्यरत असणाऱ्या गॅस एजन्सी या कारवाईतून मोकाट आहेत. ग्राहकांसाठी कंपन्यांनी दिलेले सिलिंडर काळ्या बाजारात कसे विकले जातात, याची चौकशीही केली जात नाही. उत्पादक कंपन्यांनी याप्रश्नी सोयिस्कर मौन बाळगले आहे. मात्र, पुरवठा विभाग व पोलिसांकडून तरी याची पाळेमुळे खणली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार ते पाच गॅस एजन्सींचा हातसिलिंडरचा इतक्या मोठ्या प्रमाणात या अड्डेचालकांना पुरवठा करणाऱ्या एकूण चार ते पाच एजन्सीज आहेत. त्या एजन्सीचे कर्मचारी ठिकठिकाणी हे सिलिंडर उतरवितात. अड्डेचालकाची मुले ती दुचाकी व चारचाकी वाहनातून अड्ड्यावर आणतात. बेमालूमपणे ही यंत्रणा कार्यान्वित असते. अड्डे उद्ध्वस्त झाले तरी एजन्सीचालकांना कोणतीही झळ पोहोचत नाही.

मुळावर घाव घालायला हवाकारवाई कितीही झाल्या तरी एजन्सीचालकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत नवनव्या जागा शोधून अड्डेचालक पुन्हा हा दुर्घटनांना निमंत्रण देणारा बाजार भरविणारच. एजन्सीवर कारवाई झाल्यास अड्डेचालकांचा सिलिंडर पुरवठा बंद होईल आणि आपोआप हा बाजारही कायमचा बंद होऊ शकतो. मात्र, त्याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी कधीही धाडस दाखविले नाही.

नागरी वस्त्यांसह निर्जन ठिकाणी अड्डेमिरज, सांगली व कुपवाड परिसरात भरवस्त्यांमध्ये हे गॅस बॉम्ब पेरले जातात. काही माफियांनी उपनगरांसह निर्जन स्थळांवर किंवा शेतीच्या जागेत असे अड्डे उभारले आहेत, हे कारवाईतून स्पष्ट झाले.

जीव गेल्यावर जाग येणार का?मिरजेत वर्षभरापूर्वी बेकायदेशीर गॅस सिलिंडर भरणा केंद्रात स्फोट झाला होता. वारंवार स्फोटाच्या घटना घडत आहेत. तरीही उत्पादक कंपन्या त्यांचे सिलिंडर सापडले म्हणून चौकशी करत नाहीत. पुरवठा विभाग, पोलिसांकडून केवळ छाप्याची कारवाई होते. सिलिंडरच्या पुरवठ्याच्या यंत्रणेपर्यंत ते पोहोचत नाहीत. अशा प्रकारच्या दुर्घटनेत लोकांचा जीव गेल्यानंतर या यंत्रणांना जाग येणार का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCylinderगॅस सिलेंडर