सांगली : शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गैरव्यवहाराची शक्यता आहे. प्रशासनाने याबाबत काटेकोर खबरदारी घ्यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.त्यांनी मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा, माध्यमिक, प्राथमिक अनुदानित शाळा, आश्रमशाळा येथे शिकविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उत्तीर्ण होणे सक्तीचे केले आहे. सेवेत असलेल्या शिक्षकांनाही ती द्यावी लागणार आहे.या पार्श्वभूमीवर ही परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी जिल्ह्यात दलाल सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. उत्तीर्ण करून देण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिषही दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. परिणामी गैरव्यवहारांची शक्यता जास्त आहे. याबाबत शासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
Web Summary : Swatantra Bharat Party demands strict measures to prevent fraud in the TET exam, made mandatory for teachers. Concerns rise about potential scams offering guaranteed passing in exchange for money. The administration is urged to take precautions.
Web Summary : स्वतंत्र भारत पार्टी ने टीईटी परीक्षा में धोखाधड़ी रोकने के लिए सख्त कदम उठाने की मांग की है, जो शिक्षकों के लिए अनिवार्य है। पैसे के बदले गारंटीकृत पास कराने वाले संभावित घोटालों को लेकर चिंता बढ़ रही है। प्रशासन से सावधानी बरतने का आग्रह किया गया है।