शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती अन् महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी

By हणमंत पाटील | Updated: May 25, 2024 17:23 IST

विधानसभेतील प्रतिस्पर्धी लक्ष : गद्दारी व विरोधकांना छुप्या मदतीचे आरोप

हणमंत पाटील

सांगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ येऊ लागल्याने बंडखोरी व गद्दारी केलेल्या नेत्यांकडून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडी अथवा महायुतीचा उमेदवार पराभूत झाला, तर त्याचे खापर आपल्या डोक्यावर नको यासाठी प्रत्येक नेत्याने सहकारी नेत्यांवर चिखलफेक सुरू केलीय. आपल्या पक्षातील विधानसभेसाठी प्रतिस्पर्धी असल्याने विरोधकाला कशी छुपी मदत केली, कशी गद्दारी केली, या आरोपांची राळ उडवून जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न आघाडी व महायुतीतील नेत्यांकडून सुरू आहे.सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उद्धवसेनेचा जिल्ह्यात एकही आमदार, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक नसतानाही दुहेरी महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी आघाडीधर्म पाळण्यासाठी केवळ व्यासपीठावर उपस्थितीची औपचारिकता दाखविली. मात्र, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघडपणे विशाल पाटील यांचे काम केले.

निवडणुकीनंतर २० मे रोजी प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व विशाल पाटील यांच्या उपस्थितीत स्नेहभोजन मेळावा सोमवारी झाला. त्यावरून उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी काँग्रेसचा स्नेहभोजन मेळावा हा गद्दारीचा पुरावा असून, काँग्रेसने शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व बंडखोर विशाल पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, आम्ही आघाडी धर्म पाळला असल्याची सारवासारव पृथ्वीराज पाटील यांनी केली.दरम्यान, महायुतीच्या वतीने खासदार संजय पाटील व जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी महायुतीचे काम केले नसल्याच्या आरोपाची चौकशी करणार असल्याचे निशिकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, याच निशिकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांना मदत केल्याचा आरोप भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक व शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी निशिकांत पाटील यांचे समर्थक पुढे आले आहेत. अशा पद्धतीने महाविकास आघाडी व महायुतीतील राजकीय नेत्यांनी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून एकमेकांवर अपयशाचे खापर फोडण्यास निवडणूक निकालापूर्वीच सुरुवात केली. सांगली व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात नेत्यांच्या पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विधानसभेच्या समीकरणासाठी धडपड..लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विधानसभेची राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी कुरघोडी सुरू आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसमधून दावा करणारे पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन मेळावा घेतला. त्याला या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या गटाची अनुपस्थिती होती. असेच राजकारण भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. या मतदारसंघात इच्छुक असलेल्या राहुल महाडिक यांनी निशिकांत पाटील यांच्यावर गद्दारीचा ठपका ठेवला आहे. लोकसभेतील कामगिरीवरून विधानसभेची उमेदवारी ठरणार आहे. त्यामुळे एकमेकांना टार्गेट करीत प्रत्येकाकडून विधानसभेची समीकरणे जुळविण्यासाठी धडपड सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा