शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जतजवळ जीपचे टायर फुटून अपघात,  दोघेजण जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:21 IST

ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. 

विठ्ठल ऐनापुरे / लोकमत न्यूज नेटवर्क, जत : जत-विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती जवळ जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. 

मृतांमध्ये राजेंद्र आनंदराय बिराजदार (वय ३५, रा. उटगी) व दऱ्याप्पा संगप्पा बिराजदार( वय ३४, रा. जाडर बोबलाद) यांचा समावेश आहे. तर संजय हनुमंत कोळगिरी (रा. उटगी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. 

उटगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी जीप (एमएच ०४/ २१२१)  मधून निघाले होते. जत - नागज रस्त्यावरून त्यांची जीप भरधाव वेगात जात असतानाच, गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडे बारा वाजण्याच्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन  तिघांनाही बाहेर काढले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील मृत राजेंद्र यांचे उटगी येथे कृषी दुकान आहे. तर अन्य दोघे शेती करतात. या घटनेने उटगी व जाडर बोबलाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली