शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

सांगली जिल्हा बँकेची चौकशी आली अंतिम टप्प्यात, पंधरा दिवसांत अहवाल सादर होणार

By अविनाश कोळी | Updated: April 29, 2023 19:07 IST

सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष

सांगली : जिल्हा बँकेतील कारभाराची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या पंधरा दिवसांमध्ये ती पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चौकशी अहवाल शासनाला सादर होण्याची शक्यता आहे. तक्रारीनुसार प्रकरणांची व्याप्ती वाढल्याने चौकशीला विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकात विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेतील कारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश यापूर्वी दिले होते; परंतु चौकशीला २३ सप्टेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्र्यांकडे बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश देऊन समिती नियुक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणांची होतेय चौकशीबँकेकडून सरफेसी कायद्याअंतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखित करणे, तत्कालीन संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटी रुपयांचे कर्ज शिफारस नसताना देणे, स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड कारखान्यास चुकीच्या पद्धतीने २३ कोटी रुपये कर्जवाटप, २१ तांत्रिक पदांची बोगस कागदपत्रांच्या आधारे भरती आदींबाबत तक्रार केली होती. या सर्व प्रकरणांची चौकशी समितीकडून सुरू होती.

वारंवार लांबली चौकशीचौकशी पथकाने तक्रारीनुसार बँकेकडून माहिती घेऊन कागदपत्रांची मागणी कली होती. चौकशी अहवाल पूरक कागदपत्रांसह २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येणार होता; मात्र ही चौकशी अचानक थांबली होती. त्यामुळे तक्रारदार फराटे यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर पुन्हा चौकशीला सुरुवात झाली. मार्चअखेरीस पथक पुन्हा बँकेत दाखल झाले. आता एप्रिल संपत आल्यानंतरही चौकशी सुरू आहे.

सर्वपक्षीय नेत्यांचे लक्षज्या प्रकरणांबद्दल शासनाकडे तक्रार झाली त्यात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी सर्व पक्षांच्या नेत्यांच्या संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे चौकशीकडे सर्वच पक्षांतील प्रमुख नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक