शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भक्तीच्या वर्षावात न्हाला तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव, लाखो भाविकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:10 IST

दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन  

तासगाव: 'मंगलमूर्ती मोरयाऽऽ'च्या जयघोषात निनादलेली तासगाव नगरी, गुलाल, पेढ्यांची उधळण आणि ढोल-ताशांचे लयबद्ध वादन अशा भक्तिमय वातावरणात तासगावचा ऐतिहासिक २४६ वा रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला. रथोत्सवातील भाविकांची गर्दी आणि उत्साह नजरेचे पारणे फेडणारा ठरला.पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन आणि डॉ. आदिती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी पटवर्धन राजवाड्यातून सर्व मानकऱ्यांसह छबिना बाहेर पडली. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. उत्सवमूर्ती रथामध्ये विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे ‘श्रीं’ची आरती झाली. राष्ट्रगीत झाले आणि एक वाजता रथ ओढायला सुरुवात झाली. लाखो गणेशभक्त ‘मोरयाऽऽ’चा गजर करीत दोरखंड हाती घेऊन रथ ओढत होते. गुलाल, पेढे आणि खोबऱ्यांच्या उधळणीत रथाचा परिसर न्हाऊन निघाला. केळीचे खुंट, नारळाची तोरणे, पताका, फुलांच्या माळा आदींनी रथ सजविण्यात आला होता. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून रथाचे स्वागत केले. गणेशभक्तांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान रथाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असलेल्या श्री काशिविश्वेश्वर मंदिरापर्यंत रथ ओढण्यात आला. श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्रांची भेट झाली. ‘श्रीं’ची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला. सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, सकाळपासून ‘श्रीं’च्या दर्शनासाठी व रथावर नारळाचे तोरण बांधण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणेश मंदिरात भक्तांना दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.रथयात्रेच्या मार्गावर तसेच गुरुवार पेठ, बसस्थानक चौकापर्यंतच्या रस्त्यांवर यात्रा भरली होती. परिवहन मंत्री शंभूराज देसाई, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील, पटवर्धन कुटुंबीय आणि मानकऱ्यांसह लाखो गणेशभक्तांनी रथोत्सवात सहभाग घेतला. सोहळा पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन केले.

  • गणेशभक्तांच्या उत्साहाने तासगाव नगरी २४६ व्या ऐतिहासिक रथोत्सवाची साक्षीदार झाली.
  • 'मंगलमूर्ती मोरया'च्या घोषात रथोत्सवाला सुरुवात.
  • १२१ किलोची पंचधातूची मूर्ती रथात विराजमान.
  • लाखो गणेशभक्तांच्या गर्दीत निनादलेली तासगाव नगरी.
  • रथयात्रेत गुलाल, पेढ्यांची उधळण आणि भक्तिमय वातावरण.