शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

सांगलीतल्या बिसूर येथे बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाने लावला कॅमेरा

By संतोष भिसे | Updated: July 5, 2023 16:09 IST

`किमान पगारापुरते तरी काम करा`

सांगली : बिसूर (ता. मिरज) येथे बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाने कॅमेरा लावला आहे. दरम्यान, मंगळवारी किंवा बुधवारी दिवसभरात बिबट्याचे कोणतेही अस्तित्व कॅमेऱ्यात टिपले गेले नाही, शिवाय ग्रामस्थांनाही त्याचे दर्शन झाले नाही. मंगळवारी पहाटे बिसूरमध्ये एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. भर वस्तीत तो फिरत असल्याने शेतकरीही हवालदिल झाले. गावाचा संपूर्ण परिसर दाट ऊसशेतीने वेढला आहे. शिवाय कर्नाळ, कावजी खोतवाडी या लगतच्या गावांपर्यंतही सर्वत्र दाट वनराई, ओढे, नाले व ओघळी आहेत. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी बराच वाव आहे. मंगळवारी पहाटे तो कॅमेऱ्यात दिसल्यानंतर अन्यत्र कोठेही थांग लागला नाही. काही तरुणांनी माग काढण्याचा प्रयत्न केला, पण शोध लागला नाही.दत्त मंदिराशेजारील ओघळीमध्ये तो लपल्याची शंका होती, त्यामुळे वन विभागाने ओघळीच्या एका टोकाला कॅमेरा लावला आहे. ओघळ सुमारे ४०० ते ५०० फूट लांबीची असल्याने या कॅमेऱ्यात बिबट्या कैद होण्याची शक्यता कमी आहे. कर्नाळ रस्त्यावरील ऊस शेतीत किंवा वनराईत तो लपल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, बिबट्याने गावात कोणावरही हल्ला केलेला नाही. गोठ्यातील जनावरे किंवा कुत्र्यांवरही हल्ला केल्याची घटना नाही. तथापि एखादे मोकाट कुत्रे फस्त करुन बिबट्या निघून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.`किमान पगारापुरते तरी काम करा`दरम्यान, मंगळवारी सकाळी बिबट्याचे अस्तित्व लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने वन विभागाशी तातडीने संपर्क केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामस्थांनी पोलिस खाते आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. त्यांनी वन विभागाला दूरध्वनी केल्यानंतर सायंकाळी एक अधिकारी ग्रामपंचायतीत आला. बिबट्याच्या अस्तित्वाची कोणतीही छानबीन न करता `ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी` असे सांगणारे एक पत्र दिले आणि औपचारिकता पूर्ण केली. त्यामुळे सरपंच सतीश निळकंठ यांचा अधिकाऱ्याशी जोरदार वाद झाला. `किमान पगारापुरते तरी काम करा` असे निळकंठ यांनी सुनावले.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग