शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शिवचरित्राचे उर्दूतील पहिले भित्तीपत्रक; मोडी, उर्दूमधून शिवरायांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:17 IST

सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय असे भित्तीपत्रक करणारे राज्यातील पहिले ठरले आहे

सांगली : एकाचवेळी मोडी व उर्दू भाषेत शिवचरित्र लिहून ते भित्तीपत्रकाच्या माध्यमातून साकारण्याचा उपक्रम सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाने केला. असे भित्तीपत्रक करणारे राज्यातील हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. उर्दूसह मोडी लिपीतूनही भित्तीपत्रके तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवराज्याभिषेक दिनानिमित मोडी लिपी आणि उर्दू भाषेत शिवचरित्र लिहून ते भित्तीपत्रकाच्या माध्यमातून मांडले आहे. प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयांची भित्तीपत्रिका केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्यावतीने मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम करण्यात येतो. दरवर्षी महाविद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांचा जीवनपट मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात येतो.

प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. ऊर्मिला क्षीरसागर, मोडीशिक्षक मानसिंगराव कुमठेकर हे या उपक्रमाचे संयोजन करतात. मोडी वर्गाच्या विद्यार्थिनी शिवजयंतीनिमित्त ‘शिवस्मरण’ हे अभिनव भित्तीपत्रक करतात.

यंदा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोडी आणि उर्दू लिपीतून भित्तीपत्रक करण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी केला. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे ३० हून अधिक लेख मोडी लिपी आणि उर्दूमधून लिहिले आहेत. जिया बारगीर, अलबिया पीरजादे, नमेरा कुरणे, जोया मुल्ला यांनी उर्दूमध्ये, तर वेदश्री जोशी, जान्हवी तानवडे, काजल पांढरे, प्रणाली कांबळे, हर्षदा पुजारी, स्नेहल कांबळे, वैष्णवी संकपाळ, धनश्री आंबले, आर्या खेडेकर, मुस्कान मुजावर, प्रणाली रेडेकर, गिरीजा फडणीस, दीया पाटील, अंजली चोथे, राधिका कांबळे, नीलम इंगळे, प्रियांका म्हारगुडे, श्रेया देशमुख, सोनाली पाटील, सानिका कांबळे, डॉ. वैशाली कुलकर्णी, वैष्णवी पिसे या विद्यार्थिनींनी मोडी लिपीतील लेख लिहिले आहेत.या अभिनव भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते केले. यावेळी डॉ. नंदिनी काळे, डॉ. ऊर्मिला क्षीरसागर उपस्थित होते. याप्रसंगी मोडी लिपीतील अक्षरांची रांगोळीही रेखाटण्यात आली होती.

लेखांमध्ये माहितीचा खजाना

शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे भाषाविषयक धोरण, अशा विविध विषयांवर मोडी आणि उर्दूमध्ये लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज