शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Sangli: बाळा, तुला लाल दिव्याच्या गाडीतूनच यायला लागतंय.!; बापाच्या स्वप्नाला जिगरबाज पोराने घातली गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 16:16 IST

चंद्रमौळी घरावर लुकलुकणार लाल दिवा

युनूस शेखइस्लामपूर : बाळा, तू लाल दिव्याच्या गाडीतूनच आला पाहिजेस.! अशा शब्दांत बापाने स्वप्न पेरलं अन् या जिगरबाज पोराने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर तब्बल ४ पोस्ट काढल्या आणि पाचव्या वेळी पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. त्याच्या या कर्तृत्वाने आता चंद्रमौळी घरावर खाकी वर्दीतला लाल दिवा लुकलुकणार आहे.ही कहाणी आहे, भूषण दत्तात्रय माने या जिद्दी आणि हुशार युवकाची. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. आजी-आजोबा कळकाच्या काड्यांपासून सुप, पाट्या, कणग्या, दुरडी बनवायचे, तर वडील एका बँकेत शिपाई होते. अशा जेमतेम परिस्थितीत भूषण आपली शाळेतील बौद्धिक चुणूक दाखवत होता. दारू गुत्त्यांचा विळखा आणि उनाड, टपोऱ्यांचा गलका अशा विचित्र वातावरणात भूषण मात्र अभ्यासाच्या ध्यासात रमून जात होता.

काही कारणांमुळे बँक अडचणीत आली अन् बापाच्या रोजंदारीवर टाच आली. मात्र, अशा परिस्थितीतही न डगमगता दत्तात्रय माने यांनी वृत्तपत्र विक्री आणि जोडीला लॉटरी स्टॉलचा व्यवसाय करत भूषणच्या शिक्षणाचा डोंगर पेलला. मुलासाठी कितीही कष्ट उपसावे लागले, तरी चालतील या जिद्दीने पेटलेल्या बापाने प्रसंगी रिक्षाही चालवली. कर्जाचा भार पेलताना गगन भरारी घेणाऱ्या मुलासाठी त्यांनी श्रमाची पूजा बांधली.प्राथमिक शिक्षणापासून ते सीईटी आणि मुंबईतल्या व्हीजेटीआय मधील अभियांत्रिकी पदवी मिळवेपर्यंत भूषणने आपली उच्च गुणवत्ता कायम राखली होती. त्याच्या या गुणवत्तेमुळे परदेशातील नोकरीची संधी चालून आली होती. मात्र, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व जाणून असलेले भूषणचे चुलते बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे क्रीडा अधिकारी विकास माने यांनी त्याला स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुचवला.

त्यानंतर आपल्या ज्ञान साधनेचा अत्युच्च वापर करत भूषणन याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर, वन विभाग, गुप्त वार्ता आणि मुख्याधिकारी या पदाच्या ४ पोस्ट काढण्याचा विक्रम केला. भूषण हा सध्या गडचिरोली येथे मुख्याधिकारीपदी काम करत आहे. या सेवेत असताना त्याने आता बापाने मनात पेरलेले स्वप्न पूर्ण करत पोलिस उपअधीक्षक पद पटकावले आहे.

अधिकाऱ्यांचा चौकयेथील तहसील कार्यालय परिसरात भूषणचे वास्तव्य आहे. याच परिसरात ३०-३२ वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकारी झालेले आणि सध्या अतिरिक्त सचिव असलेले आण्णासाहेब चव्हाण, मुंबईतील पोलिस उपायुक्त मितेश घट्टे हे सुद्धा याच परिसरात राहतात. भूषणच्या यशाने हा परिसर आता अधिकाऱ्यांचा चौक म्हणून ओळखला जाईल.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरMPSC examएमपीएससी परीक्षा