शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मागील हिशेब द्या, मगच साखर कारखाने सुरू करा - राजू शेट्टी 

By अशोक डोंबाळे | Updated: September 8, 2023 18:21 IST

येत्या बुधवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा

सांगली : मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाचा हिशेब दिल्याशिवाय यावर्षी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला. गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाचे एफआरपीवर प्रतिटन ४०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राजू शेट्टी म्हणाले, माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याने एफआरपीवर प्रतिटन ४०० रुपये दिले आहेत. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपीवर ४०० रुपये दिले नाहीत. वास्तविक पाहता गतवर्षी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होते, त्यावेळी साखर प्रतिक्विंटल तीन हजार १०० रुपये होती. ती गृहित धरून दराची मागणी केली होती. सध्या साखर प्रतिक्विंटल तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० रुपये आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल साखरेला ७०० रुपये जादा मिळत आहेत. त्यामुळे गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाला एफआरपीपेक्षा ४०० रुपये कारखान्यांनी दिलेच पाहिजेत. कारखान्यांनी मागील गळीत हंगामाचा हिशेब द्यावा, त्यानंतरच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करावेत. या मागणीसाठी कोल्हापुरात १३ सप्टेंबरला मोर्चा काढणार आहे. तरीही कारखान्यांनी गळीत हंगाम चालू करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरीच कारखान्यांचे गळीत हंगाम बंद पाडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळ जाहीर करायंदा पाऊस नाही, खरीप वाया गेला आहे. जे नुकसान झाले ते भरून निघणारे नसल्याने राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. नैसर्गिक आपत्तीत विमा योजनेची शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. पण, सरकारच्या मध्यस्थीने विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.मराठा आंदोलनास पाठींबामराठा आरक्षणाचा संसदेमध्ये २०११ मध्ये सर्वप्रथम मी प्रश्न मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. आरक्षणासाठी राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. राज्यातील ९५ टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने मराठा समाजापुढे आर्थिक दारिद्र्य निर्माण झाले आहे. समाजाला भक्कम करायचे असेल तर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी