शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेडबाळ मठाचा हत्ती सांगली वन विभागाने घेतला ताब्यात, माहुतावर गुन्हा दाखल 

By संतोष भिसे | Updated: April 22, 2024 16:28 IST

नांद्रे (ता. मिरज) येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आणला होता हत्ती 

सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी हत्ती आणला होता. तो वन विभागाने ताब्यात घेतला असून वन अधिनियमानुसार माहुतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हत्तीच्या वाहतुकीसाठी परवाना नसणे यासह विविध गुन्हे दाखल केल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. शेडबाळ (ता. कागवाड) येथील एका मठाच्या मालकीचा हा हत्ती नांद्रे येथील धार्मिक कार्यक्रमासाठी ट्रकमधून आणला होता. कार्यक्रमातील मिरवणुकीत दिवसभर तो सहभागी झाला. त्याच्या पाठीवरील अंबारीत काही भाविकही बसले होते. हत्तीच्या वापराबाबत व वाहतुकीविषयी कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन झाल्याची तक्रार मिरजेतील एका प्राणीमित्राने वन विभागाकडे केली. त्यानंतर वन विभागाच्या भरारी पथकाने हत्ती ताब्यात घेण्याची कार्यवाही केली. सांगलीत वसंतदादा साखर कारखाना परिसरात ट्रकमधून नेताना रविवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. कुपवाडमध्ये वन कार्यालयात रात्रभर ठेवले. सोमवारी सकाळी तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद ढगे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली.

हत्तीच्या सोंडेत बालकनांद्रे येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान मिरवणुकीत सहभागी झालेल्या हत्तीच्या सोंडेत भाविकांनी एका बालकाला दिले. हत्तीने त्याला सोंडेत धरुन उंचावले आणि पुन्हा पालकांच्या ताब्यात दिले. यादरम्यान, घाबरलेल्या बालकाने रडून आकांत मांडल्याचे पहायला मिळाले.शेडबाळच्या हत्तीला डिमांडविविध धार्मिक कार्यक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी, उदगाव, कुंथुगिरी येथून सांगली जिल्ह्यात हत्ती आणले जायचे. गेल्या काही वर्षांत त्यांनी सांगली जिल्ह्यात हत्ती पाठविणे थांबविले आहे, त्यामुळे शेडबाळच्या हत्तीला भलतीच मागणी आहे. त्यासाठी अनेकदा कायदेशीर तरतुदींचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांद्रे येथील कार्यक्रमाला आणलेला हत्ती आम्ही ताब्यात घेतला आहे. वाहतुकीसाठी योग्य परवाना नसल्याने वन अधिनियमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. - महंतेश बगले, वन परिक्षेत्र अधिकारी (भरारी पथक)

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी