शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Sangli: मशागत सुरु असताना तोल गेला, रोटरमध्ये सापडून चालक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:46 IST

वांगी : शेळकबाव (ता. कडेगाव) येथे शेतात मशागतीचे काम करीत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून संदीप सीताराम राठोड ...

वांगी : शेळकबाव (ता. कडेगाव) येथे शेतात मशागतीचे काम करीत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून संदीप सीताराम राठोड (वय ३५, मूळ रा. पांढुर्णा, ता. पुसद, जि. यवतमाळ, सध्या रा. भाळवणी नमाज, टेक) हा युवक ठार झाला. काल, रविवारी (दि.२६) ही घटना घडली.याबाबत चिंचणी - वांगी पोलिसांतून मिळालेले माहिती अशी, शेळकबाव येथील शेतकरी शंकर भीमराव कदम यांच्या वडाचे माळ शिवारात असणाऱ्या रिकाम्या शेतात मशागतीसाठी त्यांनी भाळवणी (ता. खानापूर ) येथील मक्सुद मन्सूर शिकलगार यांना सांगितले होते. त्यांनी रविवारी (दि.२६) त्यांचा ट्रॅक्टर (क्र. एमएच १९ सीएन ६६२९) चालक संदीप सीताराम राठोड यास मशागतीसाठी पाठवून दिले होते. चालक संदीप याने त्याचा मुलगा जयदीप राठोड (वय ७) यास सोबत घेऊन आला होता. व त्यास तेथेच शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसविले होते. दुपारच्या सुमारास संदीपने रोटरने मशागत करण्यास सुरुवात केली. थोडी मशागत झाली त्यानंतर शेतमालक बांधावर ठेवलेली पाण्याची बाटली आणण्यासाठी गेले. रानात मोठा दगड लागला म्हणून संदीप राठोड हा रोटर चालू ठेवून खाली उतरला व दगड टाकून पुन्हा ट्रॅक्टरवर बसण्यासाठी जाताना त्याचा तोल जाऊन तो खाली चालू रोटरमध्ये पडला. त्यामुळे त्याचे शीर धडावेगळे झाले, तर छातीचा भाग पूर्ण छिन्नविछिन्न झाला होता. त्यात तो जागीच ठार झाला.संदीप अडकलेला पाहून त्याचा मुलगा मोठ्याने ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाजाने शेतमालक पळत रोटरजवळ आला. तेव्हा संदीप हा ट्रॅक्टरवर दिसला नाही व ट्रॅक्टर हा बंद अवस्थेत होता, म्हणून रोटरकडे पाहिले असता संदीप हा रोटरमध्ये अडकून मयत झाला असल्याचे दिसून आले.सदर घटनेची माहिती शंकर कदम यांनी तातडीने चिंचणी-वांगी पोलिसांत दिली. चिंचणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार व पोलिस हवालदार गणेश तांदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तर तपासणीसाठी चिंचणी-वांगी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू