शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पावसामुळे कुसाईवाडी येथील बंधारा फुटला, हूंबरवाडी-धुरंदेवाडीचा संपर्क तुटला; शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:48 IST

वन विभागाने बांधला होता बंधारा

शिराळा : कुसाईवाडी-हूंबरवाडी (ता. शिराळा) येथील वन विभागाने बांधलेला बंधारा गुरुवारी (दि.११) झालेल्या पावसामुळे रात्री फुटला. बंधारा फुटल्याने येथील शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे रस्ता वाहून गेल्याने हूंबरवाडी व धुरंदेवाडी या दोन्ही वाडींतील संपर्क तुटला आहे.काही दिवसांपूर्वी आलेल्या मोठ्या पावसानंतर इथल्या रस्त्याचा भरावा वाहून गेला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने मातीचा कच्चा बंधारा फुटला आहे. पाण्याचा मोठ्या प्रवाहामुळे रस्ता वाहून गेला. बंधारा फुटल्यामुळे बंधाऱ्याखाली असणाऱ्या शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हूंबरवाडी व धुरंदेवाडी या दोन्ही वाडीतील एकमेकांचा जवळपास पाचशे पेक्षा जास्त नागरिकांचा संपर्क तुटला आहे. 

वाचा- सांगली जिल्ह्यात दहा मंडळात अतिवृष्टी; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटकाघटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळण्याबाबत पाठपुरावा करू असे सांगितले. यावेळी सरपंच शितल मुदगे, विनोद पन्हाळकर, बाजीराव खोत, मनोज दळवी, मच्छिंद्र पवार, बाजीराव सपकाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कारवाई करण्याचे आश्वासनरणधीर नाईक यांनी उपवनसंरक्षक नीता कट्टे यांना फोन वरून या घटनेबाबत कल्पना दिली. नीता कट्टे यांनी संबंधित घटनेबाबत घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले.