शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुपवाडचे कृष्णा व्हॅली चेंबरचे संचालक मंडळ बरखास्त, धर्मादाय आयुक्तांचा दणका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:50 IST

उद्योग आघाडीच्या तेरा वर्षाच्या लढ्याला यश

कुपवाड : जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योजक संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ धर्मादाय आयुक्त न्यायालयाकडून बरखास्त करण्याचा आदेश नुकताच देण्यात आला आहे. संचालक मंडळाचा गैरकारभार आणि मनमानीपणाच्या विरोधात उद्योग विकास आघाडीच्या प्रमुखांनी धर्मादाय आयुक्तांकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल होती. तब्बल १३ वर्षांनंतर त्यांच्या लढ्याला यश आले.संबंधित विभागाकडून तक्रारीनंतरच्या कार्यकाळातील संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी होणार आहे, अशी माहिती उद्योग विकास आघाडीचे प्रमुख उद्योजक डी. के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान व अंकुश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.

जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबर या उद्योजक संघटनेची स्थापना १९९१ साली झाली. या उद्योजक संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी उद्योजकांच्या अनेक प्रश्नाला वाचा फोडण्यात आली. २०१० पूर्वी या संस्थेवर अनेक दिग्गज उद्योजकांनी कामकाज सांभाळले आहे. त्यानंतर काही संचालकांनी केलेल्या हुकूमशाही, मनमानी व गैरकारभाराविरोधात उद्योग विकास आघाडीने आवाज उठवला. त्यामुळे तत्कालीन कार्यरत संचालक मंडळाने आघाडीतील डी. के. चौगुले, मनोज भोसले व जफर खान यांची संचालक मंडळातून हकालपट्टी केली होती. या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात डी. के. चौगुले यांनी धर्मादाय आयुक्त न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

यावेळी युक्तिवादामध्ये उद्योग विकास आघाडीकडून सध्याच्या कार्यरत संचालक मंडळाच्या गैरकारभाराचे अनेक कारणामे सादर करण्यात आले. यामध्ये समोरासमोर युक्तिवाद होऊन कार्यरत संचालक मंडळाचे २० पैकी ५ चेंज रिपोर्ट न्यायालयाकडून रद्द करण्यात आले, तसेच संचालक मंडळाकडून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चुकीच्या पद्धतीने खाडाखोड झाल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले.बोगस मतदार नोंदणी आणि संस्थेमधील चाललेले कामकाज घटनेनुसार नसल्याचा युक्तिवाद उद्योग विकास आघाडीच्या वकिलाकडून न्यायालयासमोर करण्यात आला. या युक्तिवादावर धर्मादाय न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. त्यामध्ये कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्समधील सध्याच्या कार्यरत संचालक मंडळाच्या कारभारावर ठपका ठेवला, तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय दिला आहे.आमचा लढा उद्योजकांच्या विरोधात नाही..तत्कालीन कार्यरत संचालक मंडळाच्या मनमानी आणि गैरकारभाराची चौकशीही होणार आहे. आमचा लढा हा कोणत्याही उद्योजकांच्या विरोधात नसून संघटनेत चाललेल्या मनमानी गैरकारभाराविरोधात आहे. या पुढील कालावधीतही संस्थेचे कामकाज घटनेनुसार आणि उद्योजकांच्या हितानुसार चालावे, यासाठी आमचा लढा सुरू राहील, असे मत उद्योग आघाडीकडून व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगली