शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या गाड्यांवर आता करडी नजर

By संतोष भिसे | Updated: April 7, 2023 17:56 IST

संतोष भिसे सांगली : भूम एसटी आगारात मोडक्या-तोडक्या एसटीवर मुख्यमंत्री व राज्य शासनाची जाहिरात केल्यानंतर प्रचंड गहजब झाला. ‘राष्ट्रवादी’चे ...

संतोष भिसेसांगली : भूम एसटी आगारात मोडक्या-तोडक्या एसटीवर मुख्यमंत्री व राज्य शासनाची जाहिरात केल्यानंतर प्रचंड गहजब झाला. ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. भूमच्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे एसटीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या गाड्यांविरोधात महामंडळाने कडक मोहीम सुरू केली आहे.मुंबईत मध्यवर्ती स्थानकात आठवडाभरापूर्वी केलेल्या तपासणीत १० गाड्यांमध्ये दोष आढळले. अहमदनगर, सांगली, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, बीड, पुणे व सोलापूर विभागातील या गाड्या होत्या. त्यामुळे यांत्रिकी विभागाच्या महाव्यवस्थापकांनी या विभागांना नोटिसा जारी केल्या आहेत.त्यामध्ये म्हटले आहे की, आपल्या विभागात गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम व्यवस्थित होत नाही.  मुंबईत तपासणीअंती दोष सापडलेल्या गाड्यांबाबत जबाबदारी निश्चित करावी. संबंधितांवर कारवाई करावी. आढळलेल्या त्रुटी त्वरित दूर कराव्यात. गाडीमध्ये दोष असतानाही, ती प्रवासी वाहतुकीसाठी का दिली? याची जबाबदारी निश्चित करावी. कारवाईचा अहवाल त्वरित द्यावा. अशा सदोष गाड्या भविष्यात रस्त्यावर येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.मुंबईतील तपासणीत आढळलेले दोष असे : कोपरगाव (अहमदनगर) : दोन आसने फाटलेली, गाडीचा रंग उडालेला, हेडलाईटचे कव्हर निघालेले. शिराळा (सांगली) : गिअरच्या लिव्हरवर कव्हर नाही. राजापूर (रत्नागिरी) : लिव्हरचे कव्हर फाटलेले, गाडीचा रंग उडालेला. भोर (पुणे) : पुढील काच फुटलेली, आसनांची पुशबॅक बटणे खराब. श्रीवर्धन (रायगड) : आसने धुळीने माखलेली. चिपळूण (रत्नागिरी) : चालकापुढील बल्ब फुटलेला, बम्परही तुटलेले. करमाळा (सोलापूर) : गाडीत अस्वच्छता, प्रवाशांसाठीचे पडदे धुळीने माखलेले, पुढील काच पूर्णत: फुटलेली. बीड : गिअरवरील कव्हर फाटलेले. गेवराई (बीड) : प्रवाशाचे स्लीपर आसन धुळीने माखलेले.कोल्हापूरकरांनी पंख्याच्या पट्ट्याने दरवाजा बांधला!कोल्हापूर आगाराच्या गाडीतील मागील बाजूच्या संकटकालीन खिडकीच्या दरवाजाचे लॉक तुटले होते. यंत्र शाळेतील कर्मचाऱ्यांनी कल्पकता दाखवीत दरवाजा चक्क फॅन बेल्टने बांधल्याचे आढळले. यातुन एसटी बसची आवस्था समोर येत आहे.

टॅग्स :Sangliसांगली