शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेला दणका; २४ कोटी भरा, अन्यथा बँक खाती गोठवू

By शीतल पाटील | Updated: April 21, 2023 18:24 IST

भविष्य निर्वाह निधी प्रकरणात कोल्हापूर आयुक्तांची नोटीस

सांगली : महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर वर्ग केलेली नाही. याबाबत कामगार सभेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. औद्योगिक न्यायालयाने कामगार सभेच्या बाजूने निकाल दिला. तरीही महापालिकेने २४ कोटी ५४ लाख रुपयांच्या रकमेचा भरणा केला नाही. अखेर भविष्य निर्वाह निधी कोल्हापूर विभागाच्या आयुक्तांनी महापालिकेला नोटीस बजावून रक्कम न भरल्यास बँक खाती गोठविण्याची नोटीस बजाविली आहे.दरम्यान, महापालिकेने सहा कोटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे भरून नोटीशीला स्थगिती मिळविल्याचे सांगण्यात आले.याबाबत माहिती अशी की, महापालिकेकडील बदली, मानधन, रोजंदारी असे सुमारे ९ हजार २०० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हीडंड फंड महापालिकेने कपात करावा म्हणून संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला. तरीही महापालिका संघटनेच्या मागणीस दाद दिली नाही. संघटनेच्यावतीने औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली. कामगारांना जानेवारी २०११ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीतील प्रॉव्हीडंड फंडाची रक्कम महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली नसल्यामुळे कामगार व व महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह कोल्हापूर कार्यालयाकडे भरावी, अशी मागणी केली. त्यावर औद्योगिक न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२१ मध्ये कामगार संघटनेच्या बाजूने निकाल देताना तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश कोल्हापूर भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना दिले होते.न्यायालयाच्या निकालानंतरही महापालिकेने कोणतीच कार्यवाही केली नाही. अखेर कामगार संघटनेने कोल्हापूर आयुक्तांनाकडे तक्रार दाखल केली. महापालिकेने २४ कोटी ५४ लाख ५९ हजार ९६७ रुपयांचा भरणा करण्याची नोटीस दिली. तसेच रक्कम जमा न केल्यास बँकेची खाती गोठविण्याचा इशाराही दिला.या कारवाईनंतर महापालिकेने कोल्हापूर आयुक्तांकडे अपील दाखल केले. त्यापोटी ६ कोटी १३ लाख ६४ हजार रुपये जमा करून उर्वरित ७५ टक्के रकमेबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती घेतली आहे.

टॅग्स :SangliसांगलीProvident Fundभविष्य निर्वाह निधी