शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कॉल, ठाकरेंची शिवसेना अलर्ट; समर्थन मिळविण्याचे युद्ध पेटले

By अविनाश कोळी | Updated: October 29, 2022 18:42 IST

स्वयंचलित मोबाइल यंत्रणेद्वारे व्हॉईस कॉल करून समर्थन नोंदणी पद्धतीची यंत्रणा भाजपच्या आयटी विभागाने करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता.

सांगली : जिल्ह्यासह राज्यात दोन शिवसेनेत नवा संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने कॉल करून समर्थन नोंदविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्याचा दाखला देत ठाकरे यांच्या शिवसेनेने संबंधित क्रमांक पाठवून कार्यकर्त्यांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. सांगलीतील पदाधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे संदेश मोबाइलद्वारे पाठविण्यास सुरुवात केली आहे.ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या ऑनलाइन पत्रकात म्हटले आहे की, शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून राज्यात बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून स्वयंचलित मोबाइल यंत्रणेद्वारे व्हॉईस कॉल करून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. हा कॉल आल्यानंतर एक दाबा, असे ते सूचना करतात. एक दाबल्यानंतर संबंधित प्रणालीद्वारे त्यांच्या गटाला समर्थन नोंदविले जात आहे. अशाच पद्धतीची यंत्रणा भाजपच्या आयटी विभागाने करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता.राज्यातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी सोशल मीडियावरील शिवसैनिक व सर्व अंगीकृत संघटनांना याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे मेसेज पूर्णपणे वाचून आपापल्या विभागातील सर्वांपर्यंत पोहोचवावेत. या व्हॉईस कॉलला प्रतिसाद देऊन त्यांच्या सिस्टीमला जॉईन होऊ नये, अशीही सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.

जिल्ह्यातही असे कॉल येत आहेत. आम्ही सर्व शिवसैनिकांना अशा कॉलला प्रतिसाद न देण्याची विनंती केली आहे. जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही हा मेसेज पोहोचविला आहे. - शंभूराज काटकर, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट) सांगली

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे