शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर

By श्रीनिवास नागे | Updated: December 3, 2022 18:09 IST

जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन धादांत खोटे

सांगली : जतच्या वंचित ६५ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी २००० कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा आणि जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन धादांत खोटे आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याची टीका जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.जगताप म्हणाले, शुक्रवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक म्हैसाळ योजनेसाठी नव्हतीच, तर जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी २०० कोटी रुपये त्यांनी दिले आहेत. ही वस्तुस्थिती खरी आहे; परंतु विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.

कारण या योजनेला अद्याप कसलीही तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. त्याचे अंदाजपत्रक नाही आणि अजूनही मंत्रिमंडळासमोर विषय आलेला नाही. मंत्रिमंडळाकडे अजून फाईलच गेलेली नाही. विस्तारित योजनेची फाईल नाशिकमध्ये पडून आहे. शिवाय शुक्रवारच्या बैठकीला ज्यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. जलसंपदा खात्याचे सचिव, अधिकारीदेखील उपस्थित नव्हते.विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्याकर्नाटकने जतवर केलेल्या दाव्यानंतर येथील जनतेचा संभ्रम दूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी कदाचित हे वक्तव्य केले असावे. जोपर्यंत विस्तारित योजनेसाठी ठोस असा निर्णय होत नाही, तोवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पाणी योजनांचे जाणकार, अभ्यासक व ज्यांनी संघर्ष केला, अशा सर्वांना बोलावून ठोस कृतिशील कार्यक्रम जाहीर करावा.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकjat-acजाट