शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत विक्रम सावंत यांच्या आमदार निवासातील खोलीचे छत कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:55 IST

मुंबई/जत : मुंबईत मंत्रालयालगत असलेल्या आमदार निवासमध्ये असलेल्या जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या खोलीचे छत कोसळले. रविवारी सकाळी ...

मुंबई/जत : मुंबईत मंत्रालयालगत असलेल्या आमदार निवासमध्ये असलेल्या जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या खोलीचे छत कोसळले. रविवारी सकाळी ही घटना घडली. सावंत हे आमदार निवासातील खोली क्रमांक ४०१ मध्ये राहतात. खाेलीतील ॲन्टी चेंबरमधील प्लास्टरसह छत कोसळले. सुटीचा दिवस असल्याने रविवारी याठिकाणी कोणीही नव्हते. यामुळे माेठी दुर्घटना टळली.विधान भवन परिसराला लागून आमदार निवास आहे. सुमारे २८ ते ३० वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली आहे. वर्षाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले हाेते. या पाहणीत इमारत धोकादायक झाल्याचे नमूद केले होते. दरम्यान, या घटनेमुळे मनोरा आमदार निवासाच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. नरिमन पॉइंट परिसरात आमदार निवासाच्या चार इमारती १९९६ साली बांधून पूर्ण झाल्या. अवघ्या ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींचे अंतर्गत बांधकाम सध्या खराब झाले आहे. सदनिकांमधील छताचा गिलावा व प्लास्टर कोसळत आहे. काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले आहे. गेली दोन वर्षे सातत्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आमदारांकडूनही तक्रारी करण्यात येत आहेत.आमदार विक्रम सावंत यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती करण्यात आली नाही. याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली