शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ५०.२९ कोटींचा, १६ कोटींच्या कामांना कात्री

By संतोष भिसे | Updated: March 8, 2024 18:28 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलर प्रकल्प

सांगली : जिल्हा परिषदेचा २०२३-२४ चा १३६ कोटी ८१ हजार ६२३ रुपयांचा अंतीम सुधारीत अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर करण्यात आला. आगामी २०२४-२५ या वर्षासाठी ५० कोटी २९ लाख २७ हजार ८८६ रुपयांची मूळ तरतूद करण्यात आली आहे. ३७ हजार ७१७ रुपयांची शिल्लकही दाखविण्यात आली आहे.  मागील वर्षी मूळ अर्थसंकल्प ६६.१४ कोटींचा होता. त्यामध्ये यावर्षी सुमारे १६ कोटींच्या तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विकास कामांना मोठ्या प्रमाणात कात्री लागणार आहे. मुद्रांक शुल्क व उपकरापोटी शासनाकडून ५१ कोटी ७१ लाख रुपये येणे थकीत आहेत. ही रक्कम मिळाल्यानंतर अर्थसंकल्पात विकास कामांच्या तरतूदी वाढवण्यात येणार असल्याचे धोडमिसे यांनी सांगितले. यावेळी वित्त व लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण उपस्थित होते.मूळ अर्थसंकल्पात २ कोटी २ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद अध्यक्ष, उपाध्यक्षांचे मानधन, प्रवास भता आणि अनुषंगिक खर्चासाठी केली आहे. नव्याने इ गव्हर्नन्स हे लेखाशीर्ष निर्माण केले असून त्याद्वारे प्रशासनाची गतिमानता वाढवण्यासाठी काही प्रकल्प सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविले जातील. ग्रामपंचायत विभागासाठी ४ कोटी २५ लाखाची तरतूद आहे. मुद्रांक शुल्क हिश्श्यातून २ कोटी ५० लाखांची तरतूद आहे. यशवंत वसंत घरकुल योजनेतून आपत्ती व्यवस्थापनासाठी तरतूद बाजुला ठेवून एक कोटींची तरतूद केली आहे. शिक्षण विभागासाठी १ कोटी ५६ लाख ७९ हजार ठेवले आहेत. जीवन कौशल्य विकास आणि तत्सम शैक्षणिक कार्यक्रमांसाठी १५ लाख, हॅपिनेस प्रोग्रामसाठी ५ लाखांची तरतूद आहे. बांधकाम विभागासाठी ४ कोटी ८८ लाख, लघू पाटबंधारेसाठी २६ लाख, आरोग्य विभागासाठी २ कोटी ४१ लाख १५ हजार ठेवले आहेत. आरोग्य शिबिरे, श्वान व सर्पदंश लस खरेदीसाठी हा निधी खर्च होईल.पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग विभागासाठी ८१ लाख २१ हजार, कृषीसाठी १ कोटी २५ लाख २६ हजाराची तरतूद केली आहे. चाफ कटरला मोठी मागणी असल्याने ५५ लाख रुपये ठेवले आहेत. पशुसंवर्धनसाठी ६३ लाख ५० हजारांची तरतूद केली आहे. समाज कल्याणसाठी १ कोटी ७३ लाख १८ हजार मिळतील. मुलींना सायकलीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ७ लाख ७९ हजार रुपये दिले जातील.महिला व बालकल्याण या विभागासाठी ३६ लक्ष ६५ हजार, निवृत्तीवेतन व संकीर्णमध्ये ७ कोटी १३ लाख २४ हजारांची तरतूद आहे.

विभागनिहाय तरतुदीग्रामपंचायत : ४.२५ कोटी, शिक्षण : १.५७ कोटी, बांधकाम : ४.८८ कोटी, लघू पाटबंधारे : २६ लाख, आरोग्य : २.४१ कोटी, पाणीपुरवठा व स्वच्छता : ८१.२१ लाख, कृषी : १.२५ कोटी, पशुसंवर्धन : ६३.५० लाख, समाज कल्याण : १.७३ कोटी, महिला व बालकल्याण : ३६.६५ लाख, अपारंपारिक उर्जा विकास : ५० लाख

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलरप्राथमिक आरोग्य केंद्रांना वीजपुरवठ्यासाठी सौरउर्जेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तेथे बॅटरी बॅकअपही असेल. बिलमुक्त आरोग्य केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीही निधीची तरतूद केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद