शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अखेर चौथ्या दिवशी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, प्रेम प्रकरणातून वारणा नदीत मारली होती उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 18:10 IST

मोबाइलला स्टेटस ठेवून नदीत उडी घेतली होती

मांगले : मांगले (ता. शिराळा ) येथील तुषार पांढरबळे या तरुणाचा मृतदेह भेंडवडे येथील वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून शनिवारी सायंकाळी ४ वाजता मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती.मांगले येथील तुषार पांढरबळे या तरुणाने शनिवारी दुपारी प्रेम प्रकरणातून मोबाइलला स्टेटस ठेवून नदीत उडी घेतली होती. नदीचे पाणी पत्राबाहेर असल्याने शनिवारी रात्र झाल्याने शोध घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी एनडीआरएफच्या २० जणांच्या पथकाने शोध सुरू केला. दरम्यान, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने नदीतील पाण्याची पातळी सुमारे सात फुटांनी कमी आल्याने पाणी पात्रात गेले होते.मांगले बंधाऱ्यापासून चिकुर्डे बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात दिवसभर दोन यांत्रिक बोटीतून शोध मोहीम राबविली. मात्र, त्यांना तुषार पांढरबळे आढळून आला नाही. तिसऱ्या दिवशी तुषारच्या नातेवाईक व मित्रांनी वारणा नदीच्या दोन्ही बाजूंनी शोध घेतला, मात्र सापडला नाही.मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे (जि. कोल्हापूर) येथील इनामदार पाणंद रस्त्याजवळील वारणा नदीपात्रात तरंगताना आढळून आला. नातेवाईकांनी याबाबतची माहिती वडगाव पोलिसांना दिली. डॉक्टरांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री त्याच्यावर बिळाशी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगली