शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर-आटपाडीत नेत्यांची कॉँग्रेसकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:52 IST

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व राष्टÑवादीची विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून भले-भले देव पाण्यात घालत होते, तिथे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मात्र सध्या सर्व प्रस्थापित नेत्यांनी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडे पाठ फिरवली आहे. कॉँगे्रसकडून पक्षाचे राज्य सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी, तर राष्टÑवादीकडे रावसाहेब पाटील आणि हणमंतराव देशमुख यांनी तिकीट मागितले आहे.हा विधानसभा मतदारसंघ गेली कित्येक वर्षे कॉँग्रेस आणि राष्टÑवादीकडेच होता. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी आ. अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख हे खूप प्रयत्न करीत होते. आता बाबर शिवसेनेत आहेत, तर राजेंद्रअण्णा भाजपात गेले. राष्टÑवादीचे तिकीट मिळविण्यासाठी ही मंडळी निवडणुकीअगोदरच मोर्चे, पाण्याचा प्रश्न आणि शेतकरी मेळावे घेऊन चांगलेच शक्तिप्रदर्शन करायची. आपणच कसे पक्षाशी आणि जनतेशी एकनिष्ठ आहोत, हे दाखवायची. तिकीट मिळाले की विजय पक्का, असेच तेव्हा समीकरण होते. राजकारणाच्या बदलत्या वाऱ्याची दिशा या मंडळींनी वेळीच ओळखली आहे. त्यामुळे बुडत्या जहाजात कशाला बसा, म्हणत त्यांनी पक्षांतर केल्याने, या राजकीय पक्षांची तालुक्यात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सत्ता असताना या पक्षांनीही आटपाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.माजी आमदार सदाशिवराव पाटील हे कॉँग्रेसचे. पण सध्या त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीआधी ते कॉँग्रेसकडून निवडणूक लढणार का नाही, ते ठरणार आहे. दि. ६ जुलैपर्यंत जे कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पक्षाकडे अर्ज करायचे होते. पण पाटील यांनी अर्ज केलेला नाही. सध्या ते आणि त्यांचे पुत्र आटपाडी तालुक्यातही सक्रिय झाले आहेत. ते आमदार असताना दर शुक्रवारी आटपाडी पंचायत समितीत यायचे. त्यातुलनेत गेल्या ५ वर्षात त्यांच्या तालुक्यात भेटी झाल्या नाहीत. पण सध्या तरी त्यांचे येणे-जाणे वाढले आहे. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षे रावसाहेब पाटील या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते. भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष फर्डे वक्ते आहेत. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे सख्य आहे. त्यांनी यापूर्वी अनेकवेळा पक्षाकडे तिकीट मागितले आहे. तसेच हणमंतराव देशमुख सध्या राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष आहेत.दिघंची गटात त्यांचा दबदबा आहे. भाजपची लाट असताना त्यांनी पं. स. सदस्य निवडून आणला आहे. कॉँग्रेसकडून तिकीट मागणारे सध्या राजाराम देशमुख हे एकमेव इच्छुक आहेत. सार्वजनिक विवाह यासह अनेक सामाजिक उपक्रम ते करतात. गलाई व्यावसायिकांचे ते नेते आहेत. कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संंबंध आहेत. निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे असले तरी, ही मंडळी प्रस्थापितांशी कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.‘वंचित’ दिशा ठरविणार?राज्यात कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि वंचित आघाडीची युती झाली, तर पुन्हा वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ जागा वाटपात कुणाला सुटणार, उर्वरित बंडखोरी करणार काय, का पाठिंबा देणार यावर, तसेच सदाशिवराव पाटील, गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरच चित्र स्पष्ट होईल.