शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विस्तारित म्हैसाळच्या इलेक्ट्रिक लाइनसाठी ८० कोटींची निविदा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:39 IST

संग्राम जगताप यांची माहिती : विलासराव जगताप यांचा उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

जत : जत पूर्वभागातील ६५ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला गती यावी यासाठी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जगतापांनी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या इलेक्ट्रिक लाइनच्या टेंडरला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना टेंडर काढण्याचा आदेश दिला व ८० कोटींचे टेंडर निघाल्याची माहिती जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.संग्राम जगताप म्हणाले, विलासराव जगताप यांनी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या ४० किमी रामझिंग मेनच्या इलेक्ट्रिक टेंडर व त्यावरील उच्च दाबाच्या एक ते दोन हजार हॉ. पॉ. १२ मोटारीचे ८० कोटींचे टेंडर निघाले नाही. त्यामुळे डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी तात्काळ संबंधित विभागाचे अभियंता हेमंत गुणाले यांना पाइप जोडणीबरोबर इलेक्ट्रिक लाइन व १२ मोटारीचे टेंडर त्वरित काढण्याची सूचना केली. त्याप्रमाणे शासन स्तरावरून ४० कि.मी. इलेक्ट्रिक लाइन व मोटारीचे ८० कोटींच्या टेंडर काढण्यास मान्यता दिली.२०२६ पर्यंत काम लागेल मार्गी : संग्राम जगतापविलासराव जगताप यांचा पाठपुरावा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने टेंडर काढण्याचे आदेश दिल्याने विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल व तालुका दुष्काळमुक्त होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जतच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिल्याबद्दल जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे आभार मानले.