शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘रेशीम’चा दहा तालुक्यांचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर : लागवड क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:26 IST

आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकºयांचा कल वाढलेला दिसत आहे

शरद जाधव ।सांगली : आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकºयांचा कल वाढलेला दिसत आहे. मात्र, जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, ती उद्ध्वस्त करण्याचाच अप्रत्यक्ष डाव शासनाने आखल्याचे दिसत आहे.

सांगली कार्यालयात कार्यरत असलेल्या चार कर्मचाºयांची अन्यत्र बदली करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार आता केवळ दोन कर्मचाºयांवर अवलंबून आहे. रेशीम विकास अधिकारी या पदाचाही कारभार कोल्हापूरच्या अधिकाºयाकडे सोपविण्यात आल्याने सांगली जिल्ह्यात रेशीम शेती करणाºया शेतकºयांना कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे.

विपरित नैसर्गिक परिस्थिती व बाजारपेठेचा भरोसा नसल्याने शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालनाकडे वळला आहे. त्यातच गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी करून दाखवित आहेत. अत्यंत कमी खर्चात व शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून रेशीम शेती करता येते. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. कमी कालावधित जादा उत्पादनाची हमी असल्याने जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळासह संपूर्ण जिल्ह्यातच थोड्याफार प्रमाणात रेशीम शेती केली जाते.

गेल्यावर्षी ३०० शेतकºयांनी ३२७ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यासाठी १ लाख १५ हजार अंडीपुंजांचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात आले होते. यातून ७० टन रेशीम कोशाचे उत्पादन झाले. याप्रकारे शेतकºयांना रेशीम शेतीचा फायदा होत असतानाच, रेशीम संचालनालयाने अचानक ९ पैकी ४ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या, तर एका कर्मचाºयाने स्वेच्छानिवृत्ती घेतली.आता कार्यरत तीन कर्मचाºयांपैकी एकाकडे प्रशासन व ‘मनरेगा’चे कामकाज असते, तर उर्वरित दोन कर्मचाºयांकडेच जिल्ह्याचा कारभार आहे. कर्मचारी कमी असल्याने शेतकºयांपर्यंत पोहोचून काम करणे जिकिरीचे होणार आहे.

यंदा ३८२ एकरवर रेशीम शेतीचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, आता कर्मचारीच नसल्याने नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरीही रेशीम उत्पादनास नकार देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुन्या चांगले काम केलेल्या कर्मचाºयांना पुन्हा नेमणूक देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.जिल्ह्यातील रेशीम शेती...एकूण लागवड क्षेत्र : ३२७ एक ररेशीम शेती करणारे शेतकरी : ३००अंडीकोशांचे वाटप : १ लाख १५ हजाररेशीम उत्पादन : ७० टन

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी