शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या संपामुळे गमवावा लागला त्या दहा प्रवाशांना आपला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 11:05 IST

एसटीच्या संपामुळे ट्रकमधून प्रवास करणाऱ्या १0 प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात १0 प्रवासी ठार झाले आहेत तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.

ठळक मुद्देधुक्यामुळे ट्रकवरील ताबा सुटल्याने झाला अपघातमृतांमध्ये ३ महिला, ७ पुरुषांचा समावेश९ जखमीं प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरुस्थानिक ग्रामस्थांनी काढले जखमींना बाहेर

सांगली, दि. २१ : एसटीच्या संपामुळे ट्रकमधून प्रवास करणाऱ्या  १0 प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात १0 प्रवासी ठार झाले आहेत तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना सांगली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व प्रवासी फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कर्नाटक सिंधगीवरून कराडकडे येत होते.मणेराजुरी शिरढोण रोडवर मणेराजुरीपासुन २ कि.मी.अंतरावर शामनगर वस्तीजवळ एम एच ५०-४०१६ हा फरशीचा ट्रक उलटला. पहाटे हा ट्रक मणेराजुरीच्या माळावर आला असता धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा गेला. या अपघातात ट्रकच्या मागे फरशीवर बसलेले प्रवाशी फरशीखाली चिरडले गेले. यामध्ये जाग्यावर १0 जण ठार झाले आहे. ट्रकच्या केबिनमध्ये बसलेले अन्य ९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी एसटीच्या संपामुळे सिंधगीहुन कराडकडे फरशी वाहतूक करणाऱ्या  ट्रकमधून प्रवास करत होते.मणेराजुरीनजीक दाट धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये हलविलेतर जेसीबीच्या साहाय्याने ट्रक खाली चिरडलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना पहाटे २:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. अपघात स्थळी तासगांव पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. फरशीच्या ढिगाऱ्याखालून जे.सी.बी.च्या मदतीने जखमींना आणि ठार झालेल्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र एकुण किती प्रवाशी या ट्रकमध्ये होते याची माहिती मिळु शकली नाही.

 

 

 

टॅग्स :AccidentअपघातST Strikeएसटी संप