----------------------
कामेरीतील अगलीकरण केंद्रात पाच रुग्ण दाखल
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत, ज्यांच्या घरी वेगळे राहण्याची व्यवस्था नाही, अशा काेराेनाबाधित रुग्णांसाठी अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये सध्या पाच रुग्ण दाखल आहेत. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी हाेम आयसाेलेशनची साेय नसलेल्या रुग्णांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
----------------------
कामेरीत लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे काेराेनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन हतबल बनल्याचे दिसून येत आहे. सध्या गावामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन आहे. दक्षता समितीच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्या व नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच केशव पाटील, ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. नितीन चिवटे, तलाठी आर. बी. शिंदे व दक्षता समितीच्या सदस्यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.