शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

दहा लाखांचे खत अप्रमाणित

By admin | Updated: October 26, 2016 00:21 IST

कृषी विभागाची कारवाई : येळावीतील क्लास वन अ‍ॅग्रोला नोटीस

सांगली : येळावी (ता. तासगाव) येथील क्लास वन अ‍ॅग्रो बायोटेक अ‍ॅन्ड फर्टिलायझर कंपनीचे नऊ लाख ९० हजार रुपये किमतीचे एक हजार ९८० पोती दुय्यम मूलद्रव्य (खत) नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व खताला विक्री बंदचे आदेश दिले असून, खत निर्मितीचा परवाना रद्द का करू नये?, अशी नोटीसही बजाविली आहे.क्लास वन अ‍ॅग्रो बायोटेक अ‍ॅन्ड फर्टिलायझर कंपनीच्या खतांच्या नमुन्यांची पूर्वीही तपासणी केली होती. यामध्ये १०५ टन दुय्यम मूलद्रव्य खत अप्रमाणित आल्यामुळे, त्यांच्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विक्री बंदचे आदेश दिले होते. या कारवाईस महिना झाला आहे. तरीही कंपनीकडून पुन्हा उत्पादन चालूच होते. याबाबत जिल्हा परिषद विभागाचे कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, मोहीम अधिकारी धनाजीराव पाटील यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने अचानक कंपनीला भेट देऊन तपासणी केली, तसेच खताचे पुन्हा नमुने घेतले. या खताचे नमुने तपासणीसाठी कृषी विभागाच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि सल्फर हे घटक कमी आढळून आल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीने उत्पादित केलेल्या एक हजार ९८० पोती खताच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खत कंपनीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नोटीस बजावून, तुमचा खत निर्मितीचा परवाना रद्द का करू नये, असे म्हटले आहे. या नोटिसीला खत कंपनीने सात दिवसात उत्तर दिले नाही, तर तुमचा परवाना निलंबित केला जाईल, असेही नोटिसीत म्हटले आहे. या कारवाईबरोबरच अन्य खत निर्मिती कंपन्यांच्या उत्पादनांचीही अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नमुने अप्रमाणित : तरीही खताची निर्मितीकृषी विभागाच्या भरारी पथकाने जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी करून, खताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम १०, मॅग्नेशिअम ५ आणि सल्फरची १० मात्रा असण्याची गरज होती. परंतु, तपासणीमध्ये कॅल्शिअम ४.७६, तर मॅग्नेशिअमची ४.७४ मात्रा आढळून आली आहे. कॅल्शिअमची मात्रा बहुतांश नमुन्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी आढळून आली आहे. यामध्ये ३२ कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांनी विक्रेत्यांकडे पाठविलेल्या दोनशे टन खत विक्रीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यापूर्वी बंदी घातली आहे. मात्र या कंपन्यांकडून उत्पादन घेतले जात आहेच. या कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज आहे.