शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग विभागाचे जिल्ह्यात दहा औद्योगिक क्लस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 21:19 IST

औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित सांगली जिल्ह्यात १३ औद्योगिक क्षेत्रे असून सहा सहकारी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. येथे सूक्ष्म आणि लघू उद्योजकांचा भरणा जास्त आहे. लघु उद्योजक व ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योजकांच्या विकासासाठी शासनाने औद्योगिक समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देशासनाची मंजुरी : ग्रामविकासाला चालना; रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

महालिंग सलगर ।कुपवाड : सांगली जिल्ह्यात शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने समूह औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी दहा औद्योगिक क्लस्टर होणार आहेत. या क्लस्टरना नुकतीच शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात तीन औद्योगिक क्लस्टर सुरू झाली आहेत, तर एका क्लस्टरचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे.औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित सांगली जिल्ह्यात १३ औद्योगिक क्षेत्रे असून सहा सहकारी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. येथे सूक्ष्म आणि लघू उद्योजकांचा भरणा जास्त आहे. लघु उद्योजक व ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योजकांच्या विकासासाठी शासनाने औद्योगिक समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यास सुरूवात केली आहे.

जिल्ह्यातील सूक्ष्म आणि लघु उद्योजकांची उत्पादनक्षमता वाढविणे, स्पर्धा क्षमता उंचाविण्यासाठी क्षमतावृध्दी करणे, रोजगार निर्मिर्ती वाढविणे आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या दृष्टिकोनातूनच शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने यापूर्वी जिल्ह्यात मालगाव येथे बेदाणा, मिरज एमआयडीसीत हळद आणि गार्डी येथे गारमेंट क्लस्टर सुरू केली आहेत. यापूर्वी मंजूर झालेल्या मिरज एमआयडीसीतील म्युझिकल क्लस्टरचे काम सध्या सुरू झाले आहे.

या क्लस्टर उभारणीसाठी विविध गटांना सत्तर ते ऐंशी टक्के अनुदान मिळते. क्लस्टरसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या उद्योजकांनी वीस ते तीस टक्के स्वनिधी उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या क्लस्टरच्या उभारणीसाठी उद्योजकांकडून स्वनिधी जमविण्यासाठी धडपड सुरू आहे. उद्योजकांनी हा निधी उभा केल्यास क्लस्टर उभारणी लवकर होईल.

शासनाच्या उद्योग विभागातर्फे जिल्ह्यातील उद्योजकांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांतून दहा औद्योगिक क्लस्टरना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कुपवाड एमआयडीसीतील न्यू अ‍ॅक्सेस इंजिनिअरिंग क्लस्टर, मिरज येथील बेकरी आणि प्रिंटिंग क्लस्टर, जत येथील लेदर क्लस्टर, कवठेमहांकाळ येथील हॅन्डग्लोज् क्लस्टर, कडेगाव आणि आष्टा येथील इंजिनिअरिंग क्लस्टर, इस्लामपूर येथील हळद क्लस्टर, शिराळा येथील अ‍ॅग्रो क्लस्टर आणि चिंचणी येथील बेदाणा क्लस्टरचा समावेश आहे.

स्वनिधीसाठी आर्थिक मंदीचा : अडसरजिल्ह्यात औद्योगिक क्लस्टरना मंजुरी मिळाली असूनही, या उद्योजकांना या प्रकल्पासाठी भरावयास लागणाऱ्या स्वनिधीसाठी अडचण निर्माण होऊ लागली आहे. या परिस्थितीला आर्थिक मंदी कारणीभूत असल्याचे उद्योजक बोलत आहेत. या स्वनिधीसाठीही शासनानेच मदत करावी, अशी मागणी क्लस्टर संचालकांनी केली आहे.

 

क्लस्टर मंजूर झालेल्या उद्योगांना मदत देण्यासाठी उद्योग विभागही पुढे सरसावला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्लस्टरना मंजुरी मिळाल्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्णत्वास येतील.- विद्या कुलकर्णी, व्यवस्थापिका, जिल्हा उद्योग केंद्र, सांगली

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीSangliसांगली