शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आटपाडीमध्ये ‘जलयुक्त’मधून टेंभूची कामे

By admin | Updated: June 21, 2016 01:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : लोकसहभागातून कामाला प्राधान्य; जलसंपदाच्या खर्चात बचत

सांगली : कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या आटपाडी तालुक्याला फायदेशीर ठरणाऱ्या टेंभू योजनेची रखडलेली कामे ‘जलयुक्त शिवार योजने’तून पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी घेण्यात आला. ‘जलयुक्त’मधून हे काम पूर्ण झाल्यास जलसंपदा विभागाला हे काम पूर्ण करण्यास येणाऱ्या खर्चाच्या केवळ दहा टक्के खर्च होईल, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, या कामामुळे आटपाडी तालुक्यातील ४६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. टेंभू योजनेतील रखडलेली कामे व त्यामुळे आटपाडी तालुक्यावर होत असलेल्या विपरित परिणामाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आनंदराव पाटील, टेंभूचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे आदी उपस्थित होते. टेंभू योजनेचे आटपाडी तालुक्यातील काम रखडल्याने पाण्याचा उपयोग होत नसून, ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. रखडलेले काम जलयुक्त शिवार योजनेतून करण्याबाबत चर्चा झाली. यास तालुक्यातील पाणी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी होकार दर्शवत काम पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग नोंदविण्यासही तयारी दर्शवली. तालुक्यात एकूण तीन ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेचा आधार घेऊन क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आटपाडीतून मुख्य कालव्याजवळून जाणाऱ्या नैसर्गिक ओढे, नाल्यांमधून पाणी सोडण्यासाठी नाले प्रवाहित करण्याची कामे करण्याचा निर्णय यावेळी झाला. टेंभूच्या खरसुंडी येथील मुख्य कालव्यातून बाळेवाडी, मिटकी आणि अर्जुनवाडी परिसराला पाणी देण्याचे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. बाळेवाडी ओढ्यात पाणी सोडण्यात येणार असून, तेथून बनपुरी, करगणी, मानेवाडी, तडवळे, माळेवाडी या मार्गावरून शेटफळेपर्यंत पाणी पोहोचणार आहे. या कामामुळे २८०० लाभार्थ्यांना फायदा होणार असून, ३६०० हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दुसऱ्या योजनेनुसार कचरेवस्ती तलाव ते आटपाडीचा काही भाग लेंगरेवाडी याभागात नाल्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लेंगरेवाडी येथे वापरात नसलेला कालवा असून, त्याचे काम पूर्ण करण्याचे ठरले. या कामातून एक हजार हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या दोन्ही कामांतून एकूण साडेपाच हजार हेक्टरवर क्षेत्राला लाभ होणार आहे.आटपाडी तालुक्यात टेंभूच्या मुख्य कालव्यातून पोटकालव्यांची सोय नाही. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतून काम पूर्ण होणार आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून, याबाबत पाटबंधारे विभागाकडून आठ दिवसात कामाचे नियोजन व अंदाजपत्रक सादर केले जाणार असून, त्यानंतर लगेचच कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने अग्रणीपाठोपाठ आता हा उपक्रम हाती घेतल्याने दुष्काळी भागात पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या बैठकीला अण्णासाहेब पत्की, विजय पाटील, अंकुश यमगर, गणपती खरात, शंकर गिड्डे, बाळासाहेब माळी, मुरलीधर पाटील, दगडू बाबर, पतंगराव गायकवाड, महादेव देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)