शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांची ‘जैसे थे’ नोटीस, पडळकरांवर कठोर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 12:08 IST

ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी दीडशे जणांचा जमाव सोबत घेऊन शनिवारी मध्यरात्री चार पोकलॅन लावून दहा दुकाने पाडली

मिरज : मिरजेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने दुकाने पाडल्यानंतर मिरज तहसीलदारांनी जागामालक व कब्जेदारांना ‘जैसे थे’ परिस्थितीची नोटीस बजावली आहे. संतप्त दुकानमालकांनी नोटिसा घेण्यास नकार दिल्याने वादावादी झाली. पडळकर यांच्या कृत्याच्या निषेधार्थ रविवारी सर्वपक्षीय मिरज बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती असलेले ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी दीडशे जणांचा जमाव सोबत घेऊन शनिवारी मध्यरात्री चार पोकलॅन लावून दहा दुकाने पाडून एक कोटी रुपयांचे नुकसान केले. याबाबत पडळकर यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाडलेल्या दुकानांचे अवशेष हटविण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या वादग्रस्त जागेबाबत मिरजेचे तहसीलदार दगडू कुंभार यांनी कलम १४५ प्रमाणे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवून वादग्रस्त जागेत दोन्ही गटांनी काहीही करू नये, अशी नोटीस बजावली आहे. रविवारी सकाळी काही दुकानदार पाडलेल्या बांधकामाच्या दुरुस्तीच्या तयारीत असताना प्रशासनाच्या नोटिसीमुळे येथील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिल्याने जागेवर नोटीस चिटकावून व पोलिस वाहनांतून उद्घोषणा करून नोटीस बजावण्यात आली.याबाबत जागामालक व वहिवाटदार कब्जेदारांची उद्या, सोमवारी तहसीलदारांसमोर सुनावणी होणार आहे. पडळकर बंधूंच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला. घर, दुकाने पाडली जातात. प्रशासनाचे कोणी येत नाही. दुकानांचे पाडलेले बांधकाम पुन्हा दुरुस्त करू नये. यासाठी रविवारी सुट्टीचा दिवशी एकतर्फी नोटीस काढल्याचा आरोप करण्यात येत आहे.

गुंडगिरी करणाऱ्या व घरे, दुकाने, उद्ध्वस्त करणाऱ्या पडळकर बंधूंना प्रशासन साथ देत असल्याचा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केला. पालकमंत्री अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.शहरातील मोक्याच्या जागेच्या कब्जासाठी दुकाने पाडल्याच्या निषेधार्थ मिरजेतील सर्वपक्षीय बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी नेते बाळासाहेब होनमोरे, मैनुद्दीन बागवान, पीआरपीचे इंद्रजित घाटे, मुस्तफा बुजरुक, अय्याज नायकवडी, अल्लाबक्ष काझी, जहीर मुजावर, प्रशांत सदामते यांच्यासह मिरजेतील सर्वपक्षीय पदाधिकारी व संघटनांतर्फे पडळकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगली