शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

पेठच्या दोघा व्यापाऱ्यांनी बुडविला ११ कोटींचा कर

By admin | Updated: April 28, 2017 00:47 IST

पेठच्या दोघा व्यापाऱ्यांनी बुडविला ११ कोटींचा कर

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील दोन खाद्यतेल व्यापाऱ्यांनी खोटे दस्तऐवज सादर करून शासनाचा ११ कोटींचा विक्रीकर बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला. विक्रीकर विभागाने गुरुवारी रात्री या दोघा व्यापाऱ्यांविरुध्द पोलिसांत फिर्याद दिली आहे. कर बुडवेगिरीच्या या प्रकरणाने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्यात राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.सुनीता संतोष देशमाने व महेशकुमार गजानन जाधव (दोघे रा. पेठ, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. यातील सुनीता देशमाने यांनी २०१२-१३ ते २०१४ -१५ या तीन आर्थिक वर्षात ७ कोटी ५० लाख ३२ हजार ७५५ रुपयांचा कर बुडविला, तर महेशकुमार जाधव याने २०१३-१४ आणि १४-१५ या दोन आर्थिक वर्षात ३ कोटी ४९ लाख ७३ हजार ४५१ रुपयांची कर चुकवेगिरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर विभागाचे सहायक विक्रीकर आयुक्त राजू अण्णासाहेब चौगुले (रा. कोल्हापूर) यानी दोघांविरुध्द पोलिसांत फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनीता देशमाने यांची महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, तर जाधव यांची महेश व्हेज आॅईल्स् ही फर्म आहे. हे दोघे व्यापारी रिफार्इंड पाम या खाद्य तेलाची विक्री करतात. आॅक्टोबर २०१४ मध्ये तत्कालीन सहायक विक्रीकर आयुक्त सिध्दी संकपाळ यांनी दोन्ही फर्मना भेट देऊन वरील काळातील पामतेल विक्री व्यवहाराची माहिती घेतली होती. मुंबई कस्टम विभागाकडून मिळालेली माहिती व या व्यापाऱ्यांनी विक्रीकर विभागाला पॉँडेचरी राज्यात तेल विक्री केल्याची माहिती यामध्ये तफावत आढळली. मुंबई येथील जे. एन. पी. टी बंदरावरून कस्टम ड्युटी भरून खरेदी केलेल्या तेलाची पॉँडेचरी राज्यात विक्री केल्याचे त्यांनी भासविले होते. त्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजाची शहानिशा केल्यावर या व्यापाऱ्यांनी शासनाचा कर बुडविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर केंद्रीय विक्रीकर कायद्याअन्वये कर चुकवेगिरी, फसवणूक, खोटे दस्तऐवज तयार करणे अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर व फौजदार राजगुरू अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)