शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत इमारतींच्या पार्किंग क्षेत्रावरही आकारला जाणार कर, महासभेत निर्णय 

By अविनाश कोळी | Updated: June 11, 2024 11:46 IST

अनधिकृत पाणी कनेक्शनसाठी १ लाखाच्या दंडाचा ठराव

सांगली : महापालिका क्षेत्रातील सर्व इमारतींमधील पार्किंग क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या दराप्रमाणे मालमत्ता कर आकारणी होणार आहे. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत याबाबतचा ठराव करण्यात आला. यापुढे अनधिकृत पाणी कनेक्शन आढळल्यास वापराच्या प्रकारानुसार ७ हजार ५०० ते १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत सोमवारी प्रशासकीय महासभा पार पडली. अध्यक्षस्थानी आयुक्त शुभम गुप्ता होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर, संजीव ओहोळ आदी अधिकारी उपस्थित होते.आतापर्यत महापालिका क्षेत्रात घर, अपार्टमेंट व अन्य व्यापारी संकुलांच्या इमारतींच्या पार्किंग क्षेत्राला मालमत्ता कर नव्हता. अर्पाटमेंटचे मालक ग्राहकांकडूनच देखभाल दुरुस्तीसाठी लाखोे रुपये वसूल करायचे. मात्र सदर जागेवर महापालिकेचा कोणताच कर नव्हता. मात्र आता यापुढे पार्किंग क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या दराप्रमाणे मालमत्ता कर लागणार आहे.महापालिका क्षेत्रात मध्यंतरी अनधिकृत पाणी कनेक्शन आढळली. त्याचीही गंभीर दखल या बैठकीत घेण्यात आली आहे. अनधिकृत घरगुती वापराच्या पाणी कनेक्शनसाठी दंडाची रक्कम ३ हजार रुपयांवरून ७ हजार ५०० रुपये, व्यावसायिक वापराच्या कनेक्शनसाठी ५ हजार रुपयांवरून २० हजार रुपये, तर औद्योगिक वापराच्या कनेक्शनसाठी दंडाची रक्कम १ लाख रुपये केली आहे. तसा ठराव मंजूर करण्यात आला.पाणी कनेक्शनच्या अनामत रकमेत वाढ करण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला. पाचशे चौरस फुट क्षेत्राच्या घराला पाणी जोडणीसाठी ७०० रुपये अनामत रक्कम होती. ती आता १ हजार रुपये केली आहे.

पाणी कनेक्शनसाठी जादा अनामतपाचशे चौरस फुटापेक्षा जादा क्षेत्र असलेल्या घराच्या नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रती चौरस फूट एक रुपये जादा आकारणी केली जाणार आहे. व्यावसायिक वापराच्या पाणी कनेक्शनसाठी अनामत रक्कम दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपये करण्यात आली आहे. निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Sangliसांगली