शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

तस्लिमाच्या लग्नाला महापुरुषांच्या विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:41 IST

पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला.

ठळक मुद्देरुढी, परंपरांना फाटा : आहेर न स्वीकारता येणाऱ्या पाहुणे, मित्रमंडळींना पुस्तक देऊन केले सन्मानित

अविनाश कोळी ।सांगली : लग्न म्हणजे दोन हृदयांच्या, दोन कुटुंबांच्या मीलनाचा क्षण... या आनंदाच्या क्षणांना रुढी-परंपरांचे बंधन बांधले गेले आहे. मात्र हेच धागे तोडत परिवर्तनवादी विचारांचा, महापुरुषांच्या विचारांचा जागर करीत या क्षणाला लोकप्रबोधनाचे माध्यम बनविण्याची नवी परंपरा एका मुस्लिम दाम्पत्याने सांगलीतून सुरू केली. लोकांकडून आहेर स्वीकारण्याऐवजी पाहुण्यांनाच पुस्तकरूपी आहेर देण्याचा पायंडाही या लग्नात पाडण्यात आला.

कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील हारुण मुल्ला यांनी ही मुहूर्तमेढ रोवली. परिवर्तनवादी चळवळीत काम करणाºया मुल्ला यांनी आचरणातून या चळवळीला बळ दिले. त्यांच्या मुलीचे म्हणजेच तस्लिमाचे लग्न शाहनवाज या तरुणाशी ठरल्यानंतर, त्यांनी या विवाहाला परिवर्तनवादी विचारांनी भारीत करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी संमती दिली. शाहनवाज यांचे आई-वडीलही याच विचाराचे आहेत. चिंचणी-अंबकला ३ नोव्हेंबररोजी हा विवाहसोहळा पार पडला. स्वागताला कमान उभी करून, प्रत्येक फुटावर एका महापुरुषाची प्रतिमा आणि त्याखाली त्यांचे कार्य, विचार यांचा उल्लेख केला होता. उपस्थितांसाठी हे प्रेरणादायी ठरले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, राजे उमाजीराव नाईक अशा महापुरुषांच्या सुमारे १५ फलकांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

पाहुण्यांना आहेर न आणण्याची विनंती केली होती. त्यांनाच वधू-वर पक्षाकडून पुस्तकरूपी आहेर देण्यात आला. रुढी-परंपरांच्या विरोधातील संघर्ष लग्नमंडपातही जाणवत होता. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मंत्रही या विवाहसोहळ्याने जपला.विश्वजित कदम भारावलेलग्नसोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. आ. विश्वजित कदम यांचा हा मतदारसंघ असल्याने त्यांनीही हजेरी लावली. त्यांचे स्वागतही पुष्पहार घालून न करता पुस्तके भेट देऊन करण्यात आले. फलकांची रचना, लग्नसोहळ्यातील विचारांचा थाट आणि पुस्तकरूपी भेटीतून मांडलेली प्रबोधनाची संकल्पना त्यांना भावली. त्यांनीही या सोहळ्याचे कौतुक केले.

  • एक हजार पुस्तकांचे वाटप

पाहुणे मंडळींना जी पुस्तके भेट देण्यात आली, त्यामध्ये कॉ. गोविंद पानसरेंचे ‘शिवाजी कोण होता?’, महात्मा फुले यांची ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचे आसूड’, नरेंद्र दाभोलकर यांचे ‘प्रश्न तुमचा, उत्तर आमचे’ अशा पुस्तकांचा समावेश होता. अशी एक हजार पुस्तके वाटण्यात आली. 

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न