शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:04 IST

Tasgaon Nagar Parishad Election Result 2025: तासगावातील पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करणार, असा इशारा संजयकाका पाटील यांनी विजयानंतर दिला.

Tasgaon Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदान झाले. या सगळ्याचे निकाल हाती येत आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसत आहे, तर काही ठिकाणी गड राखण्यात यश येत आहे. तासगाव नगर परिषदेत माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर संजयकाका पाटील यांनी मैदान मारले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी बाजी मारली. तासगाव नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर संजयकाका पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करणार

संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडी तासगाव नगर परिषदेवर सत्ता मिळवली आहे. विजयानंतर संजय काकांनी विरोधी गट असलेल्या आमदार रोहित पाटील गटावर टीका केली. तासगावातील पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करणार, असा इशारा संजय काका पाटील यांनी दिला. तासगावातील विजय रॅलीत आमदार रोहित पाटील यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. काकांना संपवण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र, जनतेने हे काय होऊ दिले नाही, असेही संजयकाका पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, स्वाभिमानी विकास आघाडीच्या  नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजया बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला. एकूण २४ जागांपैकी १३ जागांवर संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला विजय मिळाला, तर ११ जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjaykaka Patil wins after two defeats, Rohit Patil loses.

Web Summary : Sanjaykaka Patil's alliance won the Tasgaon Nagar Parishad election, defeating R.R. Patil's son, Rohit Patil. Patil secured 13 of 24 seats, while NCP won 11. Patil criticized rivals, vowing accountability.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकSangliसांगलीsanjaykaka patilसंजयकाका पाटीलRohit Patilरोहित पाटिल