तासगाव पालिकेत नगरसेवकांची खडाजंगी--विकास कामांचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:49 AM2017-09-21T00:49:28+5:302017-09-21T00:49:45+5:30

तासगाव : तासगाव शहरात ३४ लाख ८७ हजार रुपये खर्चून होणाºया विविध कामांच्या निविदांना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

 Tasgaon municipal corporation's murder - development work | तासगाव पालिकेत नगरसेवकांची खडाजंगी--विकास कामांचा वाद

तासगाव पालिकेत नगरसेवकांची खडाजंगी--विकास कामांचा वाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव शहरात ३४ लाख ८७ हजार रुपये खर्चून होणाºया विविध कामांच्या निविदांना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तब्बल पावणे दोन तास चाललेल्या या सभेत विविध मुद्यांवरुन सत्ताधारी भाजप व विरोधक राष्टÑवादी नगरसेवकांत शाब्दिक बाचाबाची होऊन जोरदार खडाजंगी झाली. यापुढे बघू काय करायचे ते... पण करुन बघा... अशा शब्दात झालेल्या नगरसेवकांतील या खडाजंगीने सभागृह अक्षरश: दणाणून गेले.

नगरपरिषदेच्या आर. आर. आबा पाटील सभागृहात नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्षा सौ. दीपाली दिग्विजय पाटील, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत सकाळी ११ ते १२.४५ अशी पावणेदोन तास सभा झाली. या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व १५ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले, असे मत प्रशासनाचे आहे. मात्र आॅटो रिक्षा स्टॅँडसाठी जागा निश्चित करणे व विविध विकास कामांची बिले अदा करणे या दोन विषयांना आपला विरोध असल्याचे राष्टÑवादीचे पक्षप्रतोद बाळासाहेब सावंत यांनी स्पष्ट केले.

राष्टÑवादीचे नगरसेवक अभिजित माळी, पक्षप्रतोद बाळासाहेब सावंत, सौ. निर्मला पाटील यांनी, मागील सभेतील दारुबंदी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्वीचा पुतळा हस्तांतरित करणे याबाबत ठराव झाले, पण अद्याप काहीच हालचाल का झाली नाही? अशी विचारणा केली. तसेच अभिजित माळी यांनी, गेले कित्येक दिवस झाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविना तासगाव, ही गोष्ट खेदाची आहे, असे स्पष्ट करुन, येत्या दोन महिन्यात त्यांचा पुतळा बसविण्यात यावा, यासाठी आमचे सर्व ते सहकार्य राहील, मात्र दोन महिन्यात पुतळा बसविला नाही, तर नगरसेवकांना आपल्या खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी बोलून दाखविले.
यावर बोलताना नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी, पुतळा मूर्तीकाराच्या अखत्यारित आहे. याचे काम सुरु आहे. त्यासाठी सतत पाठपुरावा केला जात असून, लवकरात लवकर पुतळा बसेल, अशी ग्वाही दिली. तसेच यापूर्वीच्या पुतळा हस्तांतरणाबाबत बोलताना

मुख्याधिकारी अभिजित वायकोस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा हस्तांतरित करण्याची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हा पुतळा तासगावातील सैनिक शाळेस विधिपूर्वक हस्तांतरित करण्यात येईल. तसेच पश्चिम महाराष्टÑात कोणी बसवला नसेल, असा पुतळा येथे बसणार असून, महाराष्टÑात कोठेही नसेल, असा चबुतरा बांधण्यात आला आहे. याबाबत कोणीही बोलत नाही, याची खंत वाटते असेही ते म्हणाले. त्यावर प्रशासनाकडून एक दिवसाचा पगार आम्ही देणार असून, प्रशासन ज्या पध्दतीने यामध्ये पुढाकार घेत आहे, त्याप्रमाणे पदाधिकाºयांनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

नगरसेवक बाळासाहेब सावंत यांनी, सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापपर्यंत का बसले नाहीत? असा सवाल करुन, हे कॅमेरे बसले असते, तर तासगावात होणारे चेन स्नॅचिंगचे प्रकार उघडकीस आले असते, असे स्पष्ट केले. तसेच केवळ ठराव करण्यापेक्षा झालेल्या ठरावांची अंमलबजावणी अगोदर व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

वराहमुक्त तासगाव करणे, या विषयावर चर्चा होताना नगरसेवक अनिल कुत्ते यांनी, शहरातील मोकाट कुत्री व इतर जनावरांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. तसेच अभिजित माळी यांनी, शहरात सुमारे २५ वळू असून त्यांचाही धोका निर्माण झाला असून त्यांचाही बंदोबस्त व्हावा व वळूमुक्त तासगाव व्हावे, अशी मागणी केली. तसेच वाहतूक कोंडीबाबत चर्चा होत असताना नगरसेवक बाळासाहेब सावंत यांनी, स्टॅँड चौक ते भिलवडी नाका या रस्त्यावर आठवडा बाजारादिवशी एकेरी वाहतूक असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवक अ‍ॅड. बाळासाहेब गुजर यांनी, दसºयापर्यंत रोजचे विके्रते नवीन मार्केटमध्ये स्थलांतरित होतील. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होईल असे सांगितले. त्यानंतर शहरात प्रमुख रस्त्यावर कोणीही विके्रते बसणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व तासगाव शहर पाटी व फेरीवालेमुक्त व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

इंदिरानगर झोपडपट्टी येथे बांधण्यात आलेल्या घरकुलमध्ये सुविधा देण्याबाबत चर्चा होताना, नगरसेवक अभिजित माळी यांनी, ज्या ठेकेदाराची चूक झाली आहे, त्याच्याकडूनच वसुली करुन या सुविधा द्याव्यात, असे स्पष्ट केले. तर नगरसेवक अनिल कुत्ते यांनी त्या ठेकेदाराच्या डिपॉझिटमधून व उर्वरित सुविधा या खासदार संजयकाका पाटील यांच्या फंडातून करण्यात येणार आहेत, असेही स्पष्ट केले.
या खडाजंगीनंतर नगरसेवक अनिल कुत्ते यांनी अध्यक्षांना स्पष्ट सांगितले की, असे होते म्हणूनच आपण १ ते १५ विषय मताला टाकायला पाहिजे होते. त्यावर नगरसेवक अभिजित माळी यांनी, आपण काय तासगावचे मालक झाला काय? असा सवाल केला. यावरुन पुन्हा आक्रमकता दिसून आली व नगरसेवक अनिल कुत्ते यांनी, यापुढे बघू काय करायचे ते, असे बोलून दाखवले, तर अभिजित माळी यांनी ते पण करुन बघा, असा पलटवार केला. या खडाजंगीने सभागृह दणाणून गेले होते.

यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक जाफर मुजावर, अनिल कुत्ते, संतोष बेले, अ‍ॅड. बाळासाहेब गुजर, किशोर गायकवाड, दत्तात्रय रेंदाळकर, वैभव भाट, बाळासाहेब सावंत, अभिजित माळी, सुभाष धनवडे, सुभाष देवकुळे, नगरसेविका पूनम सूर्यवंशी, मंगल मानकर, रोहिणी शिरतोडे, सुनंदा पाटील, प्रतिभा लुगडे, निर्मला पाटील, पद्मिनी जावळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

मी खुर्चीत असेपर्यंत सभा संपणार नाही
तासगाव नगरपरिषदेच्या सभेला सुरुवात होतानाच नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी, सभागृहात सभेच्या अटी व नियम पाळणे आवश्यक आहे, असे सांगून, शहराच्या विकासाच्यादृष्टीने चर्चा व्हावी, असे स्पष्ट केले. तसेच सभागृहात ज्यांना बोलायचे आहे त्यांनी हात वर करावेत, आपण परवानगी दिल्यानंतरच बोलायचे असून, मी जोपर्यंत खुर्चीत आहे, तोपर्यंत सभा संपणार नाही, असेही सभागृहात सांगितले. यानंतर सभेला सुरुवात झाली. पावणेदोन तास चाललेल्या या सभेत विविध विकास कामांच्या निविदांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी अनेक विषयांवर सदस्यांमध्ये आरोप, प्रत्यारोपही करण्यात आले.

Web Title:  Tasgaon municipal corporation's murder - development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.