शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पालिकेचा बेलगाम कारभार

By admin | Updated: March 17, 2017 23:36 IST

नगराध्यक्षांकडून बदलाची अपेक्षा : निकृष्ट कामे, टक्केवारीचा पायंडा, भाजपकडून ४0 कोटींच्या कामांचे मार्के टिंग

दत्ता पाटील ल्ल तासगावतासगाव नगरपालिकेत मागील पाच वर्षात कोट्यवधींची विकासकामे झाली. सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीच्या काळात या कामांचे मार्केटिंग करण्यात आले. मात्र या कामांचा प्रभाव उलटा झाला. विकासापेक्षा टक्केवारी आणि निकृष्ट कामांनी विकास डागाळला गेला. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत तब्बल सव्वादोन कोटीच्या नवीन कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र पालिकेतील टक्केवारीच्या बेलगाम कारभारामुळे कामाच्या दर्जाबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होत आहे. हा कारभार बदलण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्याकडून बदलाची अपेक्षा असून, निकृष्ट कामे आणि टक्केवारीचा पायंडा मोडीत निघून पारदर्शी कारभाराची अपेक्षा व्यक्त होत आहे.तासगाव नगरपालिकेचे नाव चर्चेत आले की, विकास कामांपेक्षा टक्केवारी आणि कारभाऱ्यांची ठेकेदारी असेच चित्र यापूर्वीच्या काळात पाहायला मिळाले आहे. सत्ता कोणाचीही असली तरी, मक्ता मात्र कारभाऱ्यांचाच, असाच कारभार सातत्याने झाला. सत्ताधारी आणि विरोधकांकडून कामे वाटून ‘मिल बांट के खाओ’च्या कारभाराचे अनेक नमुने यापूर्वी चव्हाट्यावर आले. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर, खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कारभारी सत्तेत आले. त्यानंतर तर कामे घेण्यावरुन आणि टक्केवारीवरुन भाजपांतर्गत महाभारतापासून मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत अनेक घडामोडी झाल्या.पालिकेच्या निवडणुकीच्या काळात भाजपकडून ४० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकास कामांचे मार्केटिंग करण्यात आले होते. मात्र या कामांपेक्षा, कामातून झालेल्या बदनामीमुळे, विकास कामांचे श्रेय घेऊनदेखील त्याचा नकारात्मक परिणाम मतपेटीतून पाहायला मिळाला. निकृष्ट दर्जाची विकासकामे, रखडलेली कामे, ठेकेदार नगरसेवक, टक्केवारीसाठी कुरघोड्या अशा एक ना अनेक भानगडींमुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून पालिकेची लक्तरे वेशीवर मांडण्याचे काम झाले. पण कोट्यवधींचा खर्च होऊनही प्रत्यक्ष विकासात अपयश आले.बऱ्याच उलथापालथीनंतर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. नव्या कारभाऱ्यांच्या काळात चार दिवसांपूर्वी झालेल्या सभेत तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यांचा कारभारही पुन्हा ये रे माझ्या मागल्या असाच राहील. नगराध्यक्ष डॉ. सावंत यांच्याकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. किंंबहुना नव्याने होणाऱ्या कामांचा दर्जा चांगला असावा, कारभार पारदर्शी असावा, अशा अपेक्षा आहेत. टक्केवारी, ठेकेदारी मोडीत काढून कारभार झाला तरच गुणवत्तापूर्ण विकास होणे शक्य आहे.