शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

३६ गावे, २७९ वाड्यांवर टँकर

By admin | Updated: January 18, 2016 23:34 IST

जत तालुक्याचा आराखडा : दीड कोटींची गरज

जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील ३६ गावे आणि त्याखालील २७९ वाड्या-वस्त्यांवर ४९ टँकरद्वारे १ लाख ९७ हजार ८० नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जत तालुक्याची लोकसंख्या २ लाख ८० हजार असून, १२३ गावे व २७६ वाड्या आहेत. सध्या जानेवारी महिन्यात २९ गावे आणि त्याखालील २७९ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे एक लाखापेक्षा जादा नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत तालुक्यातील १२३ पैकी ११५ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. असा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर जत शहर व परिसरातील आठ गावे वगळता संपूर्ण तालुक्यातील गावे आणि तेथील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे, असे येथील प्रशासनाचे मत आहे.३१ मार्चअखेर इतकी बिकट अवस्था असेल, तर त्यापुढील एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. संभाव्य टंचाई कृती आराखड्यात ११५ गावे आणि त्याखालील ११६ वाड्या-वस्त्यांवर ११६ विंधन विहिरी खोदण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी ३२ लाख रुपये खर्च प्रास्तावित करण्यात आला आहे. ४९ गावे व त्याखालील ५६ वाड्या-वस्त्यांवरील ८२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन नागरिकांना तात्पुरता पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी २८ लाख ५६ हजार रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जत शहराला पाणी पुरवठा करणारे बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलाव वगळता तालुक्यात इतरत्र कोठेही यापुढील सहा महिन्यांत पाणी पुरवठा करू शकेल व पाणीसाठा उपलब्ध असणारे तलाव येथे सध्या उपलब्ध नाही. पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावात शासकीय यंत्रणेकडून पाणी पुरवठा होऊ शकेल, परंतु त्यासाठी लागणारे पाणी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारे टँकर उपलब्ध होणार आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हैसाळ-उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉलमधून बिरनाळ साठवण तलावात पाणी सोडून तेथून टँकरद्वारे पाणी उचलून यापुढील पाच-सहा महिन्यांत नागरिकांना पाणी पुरवठा करता येणार आहे. तालुक्यातील सुमारे ३८ ते ४२ हजार नागरिकांचे ऊसतोडणी कामगार म्हणून येथून प्रतिवर्षी स्थलांतर होत आहे. मार्च व एप्रिल महिन्यात ऊस गाळप हंगाम समाप्त झाल्यानंतर ते सर्वजण परत येतात. ते आल्यानंतर त्यांच्या हाताला काम देताना व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या ४५ खासगी व ४ शासकीय अशा एकूण ४९ टँकरद्वारे माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या हिवाळा असला तरी उन्हाळ्याप्रमाणे ऊन पडत आहे. थंडी गायब झाली आहे. टँकरद्वारे मिळणाऱ्या वीस लिटर पाण्यात नागरिकांची दैनंदिन गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे शासनाने माणसी चाळीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी केला आहे.काराजनगी व गुगवाड येथील नागरिकांनी टँकरची मागणी केली आहे. त्या गावांचे आणि इतर गावातून टँकरची मागणी आल्यास तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यकता असेल तेथे टँकर सुरू केला जाईल, अशी माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली.‘म्हैसाळ’चे पाणी बिरनाळ तलावामध्ये सोडावे लागणारजत तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलमधून बिरनाळ तलावात पाणी सोडावे, अशी मागणी आम्ही केली आहे. येत्या आठवड्यात यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल, अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.पाणी टंचाई वाढली : ११५ गावांना टँकरची गरजजत तालुक्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत आहे. १८ जानेवारी ते ३१ मार्च २०१६ अखेर एक कोटी ३२ लाख ८८ हजार रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. त्यामध्ये ११५ गावे, त्याखालील ६६३ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.