शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, आमदार सत्यजित देशमुख यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:02 IST

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. ...

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. वन्यप्राण्यांमुळे शेतीची झालेली नुकसानीची भरपाई शासनाने लवकर द्यावी. वन्यप्राण्यांमुळे होणारे शेती पिकाचे नुकसान रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या विषयी चर्चा करताना केली.देशमुख म्हणाले, शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये बिबट्या, गव्हा, अजगर, रानडुक्कर आदी वन्यप्राणी व वन्यजीव यांचा मोठ्या प्रमाणात वावर होत आहे. त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीमध्ये हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. दि.१६ रोजी पेठ शिराळा रस्त्यावरती रेठरे धरण गावाजवळ सर्जेराव खबाले (मु.पो.कापरी तालुका शिराळा) यांच्या वरती प्रवासादरम्यान बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सर्जेराव खबाले गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.तसेच गेल्या काही वर्षांपूर्वी ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई लवकर द्यावी. तसेच गव्यामुळे शेती पिकाचे नुकसान होत आहे. हजारो हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे तसेच मोकळे पडून राहत आहे.

कार्यवाही करावीशेतीचे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून गुढे ते बांबरवाडी खुंदलापूर ते मिरुखेवाडी, तसेच रिळे, तडवळे यासह आवश्यक असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा मोठी चर मारणे अत्यावश्यक आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाने संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनshirala-acशिराळाSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखforest departmentवनविभागFarmerशेतकरी