शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

गृहमंत्र्यांसह समर्थकांवर कारवाई करा

By admin | Updated: May 27, 2014 01:20 IST

ग्रामस्थांची मागणी : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील विक्रमी मतांनी विजयी झाल्यापासून गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते समर्थकांमार्फत तासगाव तालुक्यात दडपशाहीची कृत्ये करीत आहेत. येत्या आठ दिवसांत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर कारवाई करावी, अशी मागणी मांजर्डे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक निकालानंतर हणमंतराव देसाई व त्यांच्या समर्थकांनी संजयकाका पाटील यांच्या अभिनंदनाचे लावण्यात आलेले फलक फाडून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तरीही तासगाव पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तासगावमध्ये संजयकाकांची मिरवणूक सुरू असताना गृहमंत्री पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मांजर्डेत हनुमान मंदिरासमोर पुन्हा दोन फलक फाडण्यात आले. यावरही पोलिसांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. मतदानादिवशी गृहमंत्र्यांचे समर्थक अमोल शिंदे, नगरसेवक जाफर मुजावर यांनी मतदान केंद्रात जाऊन गुंडगिरी केली. पाच ते सहा महिन्यांपूर्वी तासगावमधून शिंदे यांनी दुचाकीवरून तलवारी घेऊन दहशत माजविली होती. गृहमंत्र्यांच्या दबावामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. निवेदनावर अ‍ॅड. स्वप्निल पाटील, सिद्धेश्वर माने, हणमंत पाटील, अविनाश पाटील, अ‍ॅड. सचिन गुजर, माणिकराव जाधव, शरद मानकर, किरण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सिकंदर मुल्ला, राजू म्हेत्रे आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)