शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी - किर्लोस्करवाडी चाचणी एक्सप्रेस १२० च्या गतीने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 10:44 IST

Railway Takari Sangli : ताकारी ते किर्लोस्करवाडीदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाची चाचणी रविवारी यशस्वी झाली. चाचणीसाठीची एक्सप्रेस १२० किलोमीटर प्रतितास या गतीने धावली. चाचणी यशस्वी झाली असून लवकरच नियमित प्रवासाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देताकारी - किर्लोस्करवाडी चाचणी एक्सप्रेस १२० च्या गतीने सुसाटप्रवासाला हिरवा कंदील लवकरच

संतोष भिसे सांगली : ताकारी ते किर्लोस्करवाडीदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाची चाचणी रविवारी यशस्वी झाली. चाचणीसाठीची एक्सप्रेस १२० किलोमीटर प्रतितास या गतीने धावली. चाचणी यशस्वी झाली असून लवकरच नियमित प्रवासाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.सकाळी ९.३५ वाजता ताकारीमधून विद्युत इंजिनासह एक्सप्रेस सोडण्यात आली, अवघ्या ६ मिनिटांत म्हणजे ९.४१ वाजता ती किर्लोस्करवाडी स्थानकात पोहोचली. ग्रामस्थ व प्रवाशांनी तिचे स्वागत केले. चाचणीदरम्यान १२० किलोमीटर प्रतितास या गतीने धावली. सध्या डिझेल इंजिनाच्या अन्य सर्व एक्सप्रेस गाड्या मिरज ते पुणे मार्गावर कमाल ११० किलोमीटर प्रतितास या गतीने धावतात. विजेवरील गाडी मात्र १२० ने सोडण्यात आली.केंद्रीय सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी स्वत: दहा डब्यांच्या एक्सप्रेसमधून चाचणी घेतली. गाडीला बसणारे हादरे, वळणावर सांभाळला जाणारा तोल, गाडी सुटल्यानंतर काही क्षणात मिळणारी गती, थांबताना बसणारे धक्के आदीचे निरिक्षण केले. यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्यासह वाणिज्य, अभियांत्रिकी, विद्युत, प्रशासन आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.सोलापूर जिल्ह्यात होटगी ते दुधनी मार्गाची चाचणी सुरक्षा आयुक्तांनी शनिवारी घेतली. त्यानंतर रविवारी पहाटे मिरजेत आले. चाचणीसाठी दहा डब्यांची स्वतंत्र एक्सप्रेस आणली होती. तिला एका बाजुला विद्युत व दुसऱ्या बाजुला डिझेल इंजिन जोडले होेते. ताकारीपर्यंत डिझेल इंजिनाने एक्सप्रेस नेण्यात आली. तेथून विद्युत इंजिनाद्वारे परत किर्लोस्करवाडीला आणली. चाचणी झाल्यानंतर सुरक्षा आयुक्त पुण्याकडे रवाना झाले. पुढे शिंदवणे ते आळंदीदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाची चाचणी घेतली.प्रवासाला हिरवा कंदील लवकरचमिरज ते शेणोलीदरम्यानचे अप मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पुण्याहून मिरजेकडे डाऊन मार्गाचे टप्प्याटप्प्याने सुरु आहे. त्यापैकी ताकारी ते किर्लोस्करवाडीदरम्यान पूर्ण झाले असून चाचणी यशस्वी झाली. त्याच्या अधिकृत घोषणेनंतर आयुक्तांकडून प्रवासाला परवानगी मिळणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली