शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

इस्लामपुरात मिठाईरूपाने लक्ष्मी दारात

By admin | Updated: October 30, 2016 23:31 IST

नगरपालिका निवडणूक : मतदारांचा भाव चांगलाच वधारणार, दिवाळीचे औचित्य साधले

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर ऐन दिवाळीत पालिक ा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या धार्मिक सणाचे औचित्य साधून उमेदवारांनी आपल्या प्रभागातील घरोघरी जाऊन मिठाईरूपाने मतदारांची दारे पूजली आहेत. नगराध्यक्षपदासाठी १ आणि नगरसेवक पदासाठी २ अशी एकूण तीन मते देण्याची संधी प्रथमच मतदारांना मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून गांधीबाबांचे दर्शन निश्चित आहे. त्यामुळे शहरातील मतदारांचा भाव चांगलाच वधारणार आहे. गेल्या तीस वर्षांत सत्ताधारी राष्ट्रवादीने आर्थिक ताकद आणि आमदार जयंत पाटील यांच्या कृपेने पालिकेवर सत्ता अबाधित ठेवली आहे. गेल्या साडेचार वर्षांत राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत, तर विरोधी गटातील नेत्यांच्यात पायपोस नव्हता. याचाच फायदा घेऊन पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा एककलमी कार्यक्रम सुरू होता. आर्थिक व बहुमताच्या जोरावर पालिकेतील सभागृहात विरोधक औषधालाही ठेवणार नसल्याचा विडा विजयभाऊ पाटील यांनी उचलला आहे. परंतु विरोधकांकडे ऐन दिवाळी आणि पालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त साधून साम, दाम, दंड या रूपाने निशिकांतदादांचे नेतृत्व आले. त्यामुळे मतांचा भाव चांगलाच वधारणार आहे. प्रभाग १, २ मध्ये राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे विरोधकांना या प्रभागात ताकद लावावी लागणार आहे. प्रभाग ३ व ४ मध्ये ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी आणि आनंदराव पवार यांच्यासारखे उमेदवार असल्याने सत्ताधाऱ्यांची ताकद तोकडी पडणार असल्याची चर्चा आहे. प्रभाग ५ मध्ये भाजपचे विक्रमभाऊ पाटील हे राजकीय अनुभवी नेतृत्व आहेत. उर्वरित उमेदवार नवखे आहेत. या ठिकाणी अंदाज बांधणे कठीण आहे. प्रभाग ७ मध्ये पालिकेतील ज्येष्ठ आणि हुशार नेतृत्व असलेले राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष संजय कोरे यांची उमेदवारी असल्याने याठिकाणी कोरे यांच्या रूपाने राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यांना या प्रभागात तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रभाग ८ मध्ये माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे चिरंजीव विश्वनाथ डांगे आणि मुस्लिम समाजातील माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्या पत्नी जरिना पुणेकर या उमेदवार असल्याने या प्रभागात डांगे गटाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाणार आहे. प्रभाग ९ मध्ये विरोधी गटातील माजी ज्येष्ठ नगरसेवक एल. एन. शहा आणि कॉँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार यापैकी कोण उमेदवार आहे, हेच कोडे विरोधकांना अजूनही उलगडले नाही. प्रभाग १० मध्ये माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे आणि माजी नगरसेवक शिवाजीराव पवार यांच्या मातोश्री सुशिला पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे विरोधकांना मोठे आवाहन आहे. प्रभाग ११ मध्ये एन. ए. गु्रपच्या विद्यमान नगरसेविका मनीषा पाटील आणि डांगे गटाचे विद्यमान नगरसेवक चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात विरोधी गटातून अजित पाटील हे नवखे उमेदवार असून, विरोधी गटाला येथे कंबर कसावी लागणार आहे. प्रभाग १२ मध्ये एन. ए ग्रुपचे विद्यमान नगरसेवक खंडेराव जाधव हे राष्ट्रवादीचे प्रमुख उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महाडिक युवा शक्तीचे विकास आघाडीतून अमित ओसवाल यांनी आपली उमेदवारी निश्चित केल्याने या प्रभागात संघर्षमय लढत होणार आहे. प्रभाग १३ मध्येही ज्येष्ठ आणि माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या प्रदीर्घ अनुभवापुढे तरुण विरोधी पक्षनेते विजय कुंभार कितपत टिकाव धरतात, याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत. गत निवडणुकीत पराभूत झालेले शहाजी पाटील हे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या हुकमी असलेल्या प्रभाग १४ मधून आपले नशीब आजमावत आहेत. परंतु या प्रभागात माजी नगरसेवक विजय कोळेकर निवडणूक लढविणार होते. परंतु त्यांचा पत्ता कट केल्याने कोळेकर समर्थक नाराज आहेत. याचा फायदा चंद्रकांत तांदळे यांना कितपत मिळतो, हे निकालावरूनच स्पष्ट होईल. काट्याची लढत पालिकेतील पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले प्रकाश शिक्षण संस्थेचे निशिकांतदादा पाटील यांच्यामध्ये काट्याची लढत आहे. या दोघांमधील मतांच्या आकडेवारीचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांतील कार्यकर्त्यांनी यावर मोठ्या प्रमाणात पैजाही लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नेमके कोणाचे पारडे जड आहे, याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे.