शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीमुळे बेदाण्याला विक्रमी उलाढालीचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:22 IST

संपूर्ण देशभरात सांगलीचा बेदाणा व्यापारासाठी असलेला नावलौकिक अधिकच अधोरेखित होऊ लागला आहे. यंदा दिवाळीसाठी संपूर्ण देशभरातून सांगलीच्या बेदाण्याला मागणी कायम होती. समाधानकारक दर आणि दर्जेदार मालामुळे यंदा सरासरी २५ हजार टन बेदाण्याची देशभरात विक्री झाल्याने दिवाळीचा आनंद वाढविणारी उलाढाल झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनाही समाधानकारक दर मिळाला असून, बेदाण्याला मागणीही चांगली होती.

ठळक मुद्देदिवाळीमुळे बेदाण्याला विक्रमी उलाढालीचा गोडवायंदा शेतकऱ्यांनाही समाधानकारक दर

शरद जाधव सांगली : संपूर्ण देशभरात सांगलीचा बेदाणा व्यापारासाठी असलेला नावलौकिक अधिकच अधोरेखित होऊ लागला आहे. यंदा दिवाळीसाठी संपूर्ण देशभरातून सांगलीच्या बेदाण्याला मागणी कायम होती. समाधानकारक दर आणि दर्जेदार मालामुळे यंदा सरासरी २५ हजार टन बेदाण्याची देशभरात विक्री झाल्याने दिवाळीचा आनंद वाढविणारी उलाढाल झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनाही समाधानकारक दर मिळाला असून, बेदाण्याला मागणीही चांगली होती.बेदाण्यासाठी संपूर्ण देशात सांगलीची बाजारपेठ अग्रेसर समजली जाते. त्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांकडून येथूनच मालाची खरेदी केली जाते. स्वच्छ व पारदर्शी व्यवहार, दर्जेदार माल आणि सुलभ वाहतूक व्यवस्थेमुळे सांगलीतील बेदाणा उलाढाल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीसाठीही चांगली उलाढाल झाल्याचे चित्र आहे.

दसऱ्यापासून १५ नोव्हेंबरपर्यंत बेदाणे सौदे पूर्णपणे बंद असतात. व्यापाऱ्यांची व्यवहार पूर्ण करण्यासाठी बेदाणा व्यापारी संघटनेने राबविलेल्या ह्यझिरो पेमेंटह्णच्या अंमलबजावणीसाठी सौदे बंद ठेवण्यात येतात. हे सौदे बंद ठेवण्याअगोदर दिवाळीसाठीची चांगली उलाढाल झाली आहे.देशभरातील बाजारपेठांमध्ये हिरवा, पिवळा व काळ्या बेदाण्यास मागणी असते. यातील हिरव्या बेदाण्याच्या खरेदीस प्राधान्य दिले जाते. दसऱ्याच्या अगोदर झालेल्या बेदाणा सौद्यांमध्ये दिवाळीची खरेदी पूर्ण करण्यात आली होती. त्यानुसार सरासरी १८ ते २५ हजार टन बेदाण्याची विक्री झाल्याचा अंदाज आहे. संपूर्ण वर्षभरात सांगलीतून सरासरी १ लाख ८० हजार ते २ लाख टनापर्यंत बेदाण्याची विक्री होत असते.

यातील दिवाळीतच विक्रमी विक्री झाली आहे. त्यामुळेच यंदा संपूर्ण देशभरात दिवाळीसाठी करण्यात आलेल्या मिठाईमध्ये सांगलीच्या बेदाण्याची चव असणार आहे. सध्या अजूनही माल शिल्लक असल्याने नवीन सौद्यांवेळी त्याची विक्री होणार आहे. दसऱ्याअगोदरच झालेल्या सौद्यांमधून ही उलाढाल झाली आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजारSangliसांगली