शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Sangli: अपंगत्वावर मात करून स्वप्नीलने पटकाविला 'आयर्न मॅन'चा किताब, विटाच्या शिरपेचात मानाचा तुरा 

By हणमंत पाटील | Updated: October 16, 2023 17:37 IST

जन्मताच अपंगत्व, तरीही नाही खचला; अन् 'आयर्न मॅन'चा किताब पटकाविला

दिलीप मोहितेविटा : जन्मताच उजवा हात व पायाला अपंगत्व. पण या शारिरीक अंपगत्वाने खचून तो घरी बसला नाही. विटा (ता.खानापूर) येथील स्वप्निल बसागरे या तरूणाने गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायएथलॉन स्पर्धेत सहभाग घेतला. अपंगत्वावर मात करून ३ तास ४० मिनिटांमध्ये ९० किलोमीटरचे सायकलिंग करीत ‘आयर्न मॅन’चा किताब पटकावून विटानगरीतील नागरिकांची मान उंचाविणारी कामगिरी केली.विटा येथील स्वप्निल बसागरे या तरूणाच्या उजव्या हाताला व पायाला जन्मताच अपंगत्व आहे. परंतु, त्याची सर्वच क्षेत्रात जिद्द व चिकाटी कायम राहिली आहे. अपंग असल्याचे कोणतेही शल्य मनात न बाळगता त्याने विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धा कोणतीही असो, आव्हान स्वीकारणे हा त्याचा स्वभाव झाला आहे. मग, स्पर्धा कोणतीही असो, चमकदार कामगिरी करणे हे त्याचे ध्येय असते.गोवा येथील पणजीमध्ये इंटरनॅशनल ट्रायएथलॉन ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ५० देशातील सुमारे १ हजार ६०० स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा अत्यंत खडतर समजली जाते. या पोहणे, सायकल चालविणे तसेच धावणे असे ११३ कि.मी.चे विविध टप्पे निश्चित वेळेत म्हणजे ८ तास ३० मिनीटांत पूर्ण करावे लागतात. त्यावेळी ‘आयर्न मॅन’चा किताब मिळतो.

रिले टीममधून केली कामगिरी..विटा येथील स्वप्निल बसागरे हा तरूण सायकलिंगसाठी रिले टीममध्ये सहभागी होता. शारिरीक अपंगत्व असल्याने त्याने सायकलच्या गिअर व अन्य पार्टमध्ये बदल करून घेतला होता. उजवा हात व पायाला अपंगत्व असल्याने त्याने सायकलच्या उजव्या बाजूला असलेले गिअर डाव्या बाजूला बसवून घेतले होते. गेल्या आठ महिन्यापासून स्वप्निल हा या स्पर्धेसाठी सातत्याने सराव करीत होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात गोवा येथे या स्पर्धा पार पडल्या. सायकलिंगसाठी चार तासात ९० कि. मी. चे अंतर पार करण्याचे मोठे आव्हान स्वप्निल पूर्ण केले.

कोल्हापुरात लोह पुरूष किताब..गेल्या महिन्यात कोल्हापूर स्पोटर्स क्लबच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत स्वप्निल बसागरे यांनी ३५ मिनिटे ३ सेकंदात पाऊण कि.मी. पोहणे, ४३ मिनिटांत ५ कि.मी. धावणे व ४५ मिनिटे ३१ सेकंदात २० कि.मी.चे सायकलिंग करून ‘लोह पुरूष’चा किताब पटकाविला होता.

टॅग्स :Sangliसांगली