शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विटा शहराचा दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, शहरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 16:32 IST

विटा : स्वच्छ भारत अभियान २०२१ सर्व्हेक्षणात देशातील क्रमांक एकचे स्वच्छ शहर ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील विटा शहराला शनिवारी दिल्लीत ...

विटा : स्वच्छ भारत अभियान २०२१ सर्व्हेक्षणात देशातील क्रमांक एकचे स्वच्छ शहर ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील विटा शहराला शनिवारी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दिल्लीत पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांनी पुरस्कार स्वीकारला.विटा शहरात कचरा कुंडीमुक्त शहर, कचऱ्याचे विलगीकरण व त्यापासून विविध वस्तूंची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, कचऱ्यापासून वीज निर्मिती, सेंद्रीय खत निर्मिती यासह विविध बाबींची केंद्रीय समितीने पहाणी केली होती. यानंतर विटा हे देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून जाहीर केले होते.शनिवारी सकाळी ११ वाजता दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते विटा शहराचा गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय नगरविकास आवास मंत्री हरदीप सिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग उपस्थित होते.नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, महिला सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांनी राष्ट्रपतींच्याहस्ते स्वच्छ शहराचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला.विटेकर झाले साक्षीदारदिल्ली येथे सुरू असलेला नेत्रदीपक सोहळा विटा येथील नागरीकांना प्रत्यक्षात पाहता यावा, यासाठी शनिवारी नगरपरिषदेच्या आवारात मोठी स्क्रिन बसवून त्यावर थेट प्रेक्षपण करण्यात आले. माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्यासह पालीकेचे कर्मचारी व नागरीकांनी विटा शहराला राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर नागरीकांनी जल्लोष केला. दिल्लीच्या या सोहळ्याचे विटेकर साक्षीदार झाले.शांताबाई झाल्या भावूकगेल्या ३४ वर्षापासून हातात झाडू घेऊन शहराची सेवा करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी शांताबाई उत्तम हत्तीकर यांना राष्ट्रपतींच्या व्यासपीठावर जाण्याचे भाग्य मिळाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रपतींना शांताबाईंची ओळख करून दिली. या शानदार सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने शांताबाई भावूक झाल्या होत्या.

टॅग्स :Sangliसांगली